ठाण्यात ज्यू धर्मस्थळाला बॉम्बने उडविण्याची धमकी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एका धार्मिकस्थळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीने गुरुवारी शहरात खळबळ उडाली. ठाण्यातील १४७ वर्ष जुन्या ज्यू धर्माच्या शार हशमैम-गेट ऑफ हेवन या संस्थेच्या इमेलवर ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून घटनास्थळी बॉम्ब शोध पथकासह, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथक असा पोलीस … The post ठाण्यात ज्यू धर्मस्थळाला बॉम्बने उडविण्याची धमकी appeared first on पुढारी.

ठाण्यात ज्यू धर्मस्थळाला बॉम्बने उडविण्याची धमकी

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एका धार्मिकस्थळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीने गुरुवारी शहरात खळबळ उडाली. ठाण्यातील १४७ वर्ष जुन्या ज्यू धर्माच्या शार हशमैम-गेट ऑफ हेवन या संस्थेच्या इमेलवर ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून घटनास्थळी बॉम्ब शोध पथकासह, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथक असा पोलीस फौजफाटा तपास कामी लावण्यात आला. मात्र पोलीस तपासानंतर ही धमकी फक्त अफवा असल्याचे समोर आले.
ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय शेजारील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचे प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा इमेल बुधवारी रात्री प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. सदर धार्मिक संस्थेच्या मेलवर अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. संस्थेने याबाबत गुरुवारी दुपारी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे चार पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. तर बॉम्बशोधक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी संबंधित धार्मिकस्थळाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. धार्मिक स्थळावर मोठा घातपात होणार असल्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे. पोलीस मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत असून फुनींग ग्रुप नामक व्यक्तीने हा मेल पाठवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
हेही वाचा :

मराठ्यांची संख्या 3 कोटी आहे का? तायवाडे यांचा जरांगे-पाटलांना सवाल
प्रशासकराज सुरू ! नगर महापालिकेला निवडणूक आयोगाचे पत्र
Congress vs Sanjay Raut : महाविकास आघाडीत फुटले फटाके! जागावाटपावरून काँग्रेस-ठाकरे गटात जुंपली

Latest Marathi News ठाण्यात ज्यू धर्मस्थळाला बॉम्बने उडविण्याची धमकी Brought to You By : Bharat Live News Media.