…तर आमदार बाबर विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील : ब्रम्हानंद पडळकर

विटा : पुढारी वृत्तसेवा : आमदार अनिल बाबर शब्दाला जगणारे असतील, तर ते येत्या विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील, असा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जि. प.चे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केला. विट्यात भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या कार्यालयात ब्रम्हानंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  Bramhanand Padalkar यावेळी युवा मोर्चाचे … The post …तर आमदार बाबर विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील : ब्रम्हानंद पडळकर appeared first on पुढारी.

…तर आमदार बाबर विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील : ब्रम्हानंद पडळकर

विटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : आमदार अनिल बाबर शब्दाला जगणारे असतील, तर ते येत्या विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील, असा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जि. प.चे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केला.
विट्यात भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या कार्यालयात ब्रम्हानंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  Bramhanand Padalkar
यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, पंकज दबडे, अनुसुचित जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, राहुल मंडले, निलेश पाटील आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदार संघातील विसापूर मंडळातील दहा गावात जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्त ते बोलत होते. Bramhanand Padalkar
पडळकर म्हणाले की, मागच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही राजकीय विरोधक असतानाही केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर विद्यमान आमदार अनिल बाबर यांना पाठिंबा दिला. त्यावेळी बारामतीच्या विश्रामगृहावर आमदार बाबर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, यावेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असा शब्द दिला होता. आमदार बाबर हे शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यामुळे यावेळी ते आम्हाला पाठिंबा देतील. त्यामुळे आम्हीच तुम्हाला निवडून आणले. मात्र, निवडणुकीनंतर पुढच्या सहा महिन्यांत त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. त्यामुळे या मतदारसंघात जरी आमदार बाबर हे मित्र पक्षाचे असले, तरी आम्ही आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.
ते म्हणाले, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी दोन वेळा आमदार बाबर यांना पाठिंबा दिला. दोन वेळा माजी आमदार सदाशिव पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून आता राजेंद्रअण्णांना पाठबळ द्यावे. आम्ही यावेळी कोणत्याही परिस्थितीत आटपाडीचा आमदार झाला पाहिजे, यासाठी आग्रही आहोत. त्यासाठी आम्ही माजी आमदार राजेंद्रअण्णा यांच्या पाठीशी उभारणार आहोत, असे पडळकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा 

सांगली : विट्याच्या प्रशासकीय कार्यालयातली तरी स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवा : आमदार अनिल बाबर
सांगली : विटा पालिकेतील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
सांगली : पतीच्या अनधिकृत बांधकामामुळे खानापूरच्या नगरसेविकेचे पद रद्द

Latest Marathi News …तर आमदार बाबर विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील : ब्रम्हानंद पडळकर Brought to You By : Bharat Live News Media.