डोळ्यात मिरची पूड टाकून शेवगावात लुटले दहा लाख

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  येथील एका कॉटन इंडस्ट्रीच्या कॅशिअरने बँकेतून काढलेले दहा लाख रुपये दोन जणांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटून नेल्याची घटना आज (गुरुवारी) शेवगाव शहरात घडली. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत मिळालेली माहिती अशी, की खुंटेफळ रोडवर असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचे कॅशिअर विठ्ठल लक्ष्मण सोनवणे यांनी दुपारी … The post डोळ्यात मिरची पूड टाकून शेवगावात लुटले दहा लाख appeared first on पुढारी.

डोळ्यात मिरची पूड टाकून शेवगावात लुटले दहा लाख

शेवगाव तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा :  येथील एका कॉटन इंडस्ट्रीच्या कॅशिअरने बँकेतून काढलेले दहा लाख रुपये दोन जणांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटून नेल्याची घटना आज (गुरुवारी) शेवगाव शहरात घडली. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत मिळालेली माहिती अशी, की खुंटेफळ रोडवर असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचे कॅशिअर विठ्ठल लक्ष्मण सोनवणे यांनी दुपारी बडोदा बँकेतून 10 लाख रुपये काढले व ते घेऊन दुचाकीवरूनइंडस्ट्रीमध्ये जात होते. त्या वेळी खुंटेफळ रोडवर पाठीमागून विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि ढकलून दिले.
त्यामुळे ते दुचाकीसह खाली पडताच चोरट्यांनी त्यांची पैसे असलेली बॅग हिसकावून पळ काढला. सोनवणे यांनी आरडाओरडा केल्याने काही ग्रामस्थ मदतीला धावले; परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सोनवणे बँकेतून पैसे काढत असताना त्यांच्यावर पाळत असावी असा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, दुचाकीवरून पडल्याने सोनवणे यांच्या पायाला जखम झाली आहे. चोरट्यांनी तलवारीचाही त्यांना धाक दाखवल्याचे समजते. सोनवणे पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी ‘आधी सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री करतो,’ असा पवित्रा घेतल्याने रात्री 8 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
Latest Marathi News डोळ्यात मिरची पूड टाकून शेवगावात लुटले दहा लाख Brought to You By : Bharat Live News Media.