MPSC : राज्यसेवा 2024 पदभरती जाहीर, 274 पदांसाठी जाहिरात

पुढारी ऑनलाईन डेस्क : शासनाच्‍या विविध विभागातील रिक्‍त पदांवर भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज (दि. 29) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पदनिहाय अटी-शर्तींचा सविस्‍तर तपशील सूचनापत्रात नमूद केले आहेत. 5 जानेवारी ते 25 जानेवारी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे.आयोगाने दिलेल्या या जाहिराती नुसार 274 … The post MPSC : राज्यसेवा 2024 पदभरती जाहीर, 274 पदांसाठी जाहिरात appeared first on पुढारी.

MPSC : राज्यसेवा 2024 पदभरती जाहीर, 274 पदांसाठी जाहिरात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शासनाच्‍या विविध विभागातील रिक्‍त पदांवर भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज (दि. 29) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पदनिहाय अटी-शर्तींचा सविस्‍तर तपशील सूचनापत्रात नमूद केले आहेत. 5 जानेवारी ते 25 जानेवारी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे.आयोगाने दिलेल्या या जाहिराती नुसार 274 पदासाठीची 2024 ची महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल रोजी होणार आहे. ही जाहिरात या लिंकवर पाहाता येईल.
या जाहिरातीत सामान्य प्रशासनात २०५ जागा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २६ जागा, तसेच महाराष्ट्र वनसेवेत ४३ जागांची भरती केली जाणार आहे.
पूर्व परीक्षा कधी?
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिल २०२४ ला होईल. ही परीक्षा ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
मुख्य परीक्षा कधी?
संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवाराच्या संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षा घेतल्या जातील. राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ ही १४ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधित होईल. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ ही २३ नोव्हेंबर २०२४ला होईल. तर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ ही २८ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधित होणार आहे.
हेही वाचा

नाशिक : महापालिका नोकरभरतीची तयारी पूर्ण, ६२४ पदांसाठी लवकरच जाहिरात
Rojgar Mela 2023 : ३ लाख तरूणांना मिळणार सरकारी नोकरीचे बंपर गिफ्ट; पंतप्रधान मोदी करणार नियुक्ती पत्रांचे वाटप
Pune News : आता घ्या मनपसंत, नोकरी देणारे शिक्षण

Latest Marathi News MPSC : राज्यसेवा 2024 पदभरती जाहीर, 274 पदांसाठी जाहिरात Brought to You By : Bharat Live News Media.