आरोग्यवर्धिनी केंद्र बनले तळीरामांचे अड्डे ; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

नगर : शहरी भागातील आरोग्यसेवा गतिमान होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरात 18 आरोग्यवर्धिनी केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यातील सात आरोग्य केंद्रांची कामे पूर्ण झाली असून, किरकोळ कामाअभावी ते तळीरामांचे अड्डे बनले आहेत. तर, ‘आपला दवाखाना’ कुलूपबंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. मनपा आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. नगर शहराची दिवसेंदिवस वाढ होत … The post आरोग्यवर्धिनी केंद्र बनले तळीरामांचे अड्डे ; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

आरोग्यवर्धिनी केंद्र बनले तळीरामांचे अड्डे ; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

सूर्यकांत वरकड

नगर : शहरी भागातील आरोग्यसेवा गतिमान होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरात 18 आरोग्यवर्धिनी केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यातील सात आरोग्य केंद्रांची कामे पूर्ण झाली असून, किरकोळ कामाअभावी ते तळीरामांचे अड्डे बनले आहेत. तर, ‘आपला दवाखाना’ कुलूपबंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. मनपा आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
नगर शहराची दिवसेंदिवस वाढ होत आहे. बोल्हेगाव, सावेडी, तपोवन रोड, कल्याण रोड, केडगाव, सारसनगर, दौंड रोड परिसरात वसाहती वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेची आरोग्य सेवा तोकडी पडत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या सहायक संचालकांच्या अधिपत्याखाली नगर शहरामध्ये सात आरोग्य केंद्रांतर्गत 18 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
हा प्रकल्प 2021 ते 2026 अशा पाच वर्षांकरिता आहे. सध्या आरोग्य विभागाने सुमारे आठ केंद्रांची कामे पूर्ण केली आहेत. महापालिकेची शेवटच्या सर्वसाधारण सभेत आरोग्यवर्धिनी केंद्राचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या वेळी आरोग्य अधिकार्‍यांनी ‘आठ केंद्रांची कामे पूर्ण झाली असून, लवकरच उद्घाटन करण्यात येईल,’ असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात आठ केंद्रांची कामे पूर्ण झाली असली तरी सध्या ते केंद्र तळीरामांचे अड्डे बनले आहेत. त्या इमारतींची डागडुजी करून रंगरंगोटी केली. त्यानंतर देखभालीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही केंद्र तळीराम व जुगार्‍यांसाठी हक्काची जागा झाले आहेत. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, नालेगावातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला कुलूप असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन दवाखाना सुरू ठेवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, 18 आरोग्यवर्धिनी केंद्रापैकी सात आरोग्य केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील पाणी, वीजजोडणी बाकी आहे. येत्या काही दिवसांत ते काम पूर्ण होऊन केंद्र सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे काम पूर्ण
संजयनगर (स्टेशन रोड), फराहबाग (सोलापूर रोड), शास्त्रीनगर (केडगाव), इंदिरानगर (अरणगाव रोड), निर्मलनगर (पाईपलाईन रोड), वैदवाडी(सावेडी), सिद्धार्थनगर (लालटाकी), बोल्हेगाव गावठाण, नालेगाव, तपोवन रोड येथील आरोग्य केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत.
Latest Marathi News आरोग्यवर्धिनी केंद्र बनले तळीरामांचे अड्डे ; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष Brought to You By : Bharat Live News Media.