गुरुजींचा साहेबी थाट ! केंद्र प्रमुखासाठी राजकीय दबा
कैलास शिंदे
नेवासा : तालुक्यात अधिकृत केंद्र प्रमुखांची संख्या कमी असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी शैक्षणिक कामकाज सोयीस्कर चालावा म्हणून काही गुरुजींकडे केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला. यामध्ये अपवाद वगळता राजकीय दबाव टाकून बर्याच जणांनी हौशीने साहेबी थाट मिळावा, या उद्देशाने हा चार्ज घेतला आहे. तर, काहींनी खासगी कामे करता यावीत म्हणून राजकीय दबाव टाकून हा चार्ज बळकाविला आहे. सध्या तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या एका केंद्राचा चार्ज अशाच एका शिक्षकाने स्वीकारून त्या माध्यमातून स्वतःची दुकानदारी थाटली आहे.
शिक्षकाचे मुख्य काम अध्यापनाचे असताना ते प्राधान्याने करून उर्वरित वेळेत हे कामकाज करने अभिप्रेत असताना त्यांचे उलट कार्य सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून ही दुकानदारी बहरण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक या भागातील प्रशासनाची वेगवेगळ्या प्रकारची कामे स्वतःकडे घेऊन अध्यापनाचे कार्य सोयीस्करपणे बाजूला करून आपल्या व्यवसायाला प्राधान्य दिले असल्याचे समजते. तालुक्याचे गट शिक्षणाधिकार्यांनाही काही कारणास्तव नाईलाजाने या प्रवृत्तींना सहन करावे लागते. प्रशासकीय यंत्रणा तोकडी असल्याने अधिकार्यांची याबाबत अपरिहार्यता दिसून येत आहे. याच गोष्टींचा या काही प्रभारी लोकांनी गैरफायदा घेतला आहे.
शिक्षकांची याबाबतीत मोठी नाराजी असून, प्रशासनाच्या दबावामुळे कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. सद्य परिस्थितीत शिक्षकांच्या दबक्या दबावामुळे जिल्ह्यात अनेक तालुक्यात प्रभारी केंद्रप्रमुख या कामातून मुक्त करण्याबाबत निवेदन देत असताना काही प्रवृत्ती; मात्र अद्यापही आपल्या स्वार्थासाठी आपला चार्ज सोडण्यास तयार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. दुकानदारी थाटून मनमानी करणार्या या केंद्रप्रमुख (भाऊ) साहेबांच्या जाचाला सर्वसामान्य शिक्षक वैतागला असून, या संदर्भात गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी अशाप्रकारे केंद्रप्रमुखांचे प्रभारी चार्ज स्वीकारल्यामुळे अधिकृत बढती प्रक्रियेद्वारे होणार्या केंद्रप्रमुख भरतीबाबत जिल्हा प्रशासनाची आजतागायत उदासीनता दिसून येत आहे.
आंदोलनाच्या मनःस्थितीत शिक्षक
प्रशासनाने यासाठी लवकरात लवकर अधिकृत केंद्रप्रमुखांची नियुक्ती करून शिक्षकांची मुक्तता करावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. हा प्रकार त्वरित बंद न झाल्यास जिल्हा पातळीवर आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत संबंधित शिक्षक असल्याचे त्यांनी सांगितले.
संगणक निरक्षर मुख्याध्यापकांना भुर्दंड
काही तालुक्यातील प्रभारी केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील ऑनलाइन प्रक्रियेचे काही पासवर्ड स्वतःकडे ठेवून त्याद्वारे संगणक निरक्षर असणार्या मुख्याध्यापकांना आर्थिक भुर्दंड देऊन त्यांची कामे करत असल्याचे निदर्शनास आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
मर्जीतील शिक्षकांना अतिउत्कृष्ट शेरे
अधिकार नसतानाही उपाध्यापकांसह ग्रेड पात्र मुख्याध्यापकांचे गोपनीय अभिलेखे भरताना खास मर्जितील शिक्षकांना अतिउत्कृष्ट शेरे दिल्यामुळे शाळा पातळीवर उत्कृष्ट काम करणार्या शिक्षकांवर अन्यायाबाबत सर्वसामान्य शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याची सखोल चौकशी करण्याबाबत लवकरच मुख्य कार्यकारी अधिकार्यांना साकडे घालण्याबाबत संघटना पातळीवर हालचाली सुरू आहे.
The post गुरुजींचा साहेबी थाट ! केंद्र प्रमुखासाठी राजकीय दबा appeared first on पुढारी.
नेवासा : तालुक्यात अधिकृत केंद्र प्रमुखांची संख्या कमी असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी शैक्षणिक कामकाज सोयीस्कर चालावा म्हणून काही गुरुजींकडे केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला. यामध्ये अपवाद वगळता राजकीय दबाव टाकून बर्याच जणांनी हौशीने साहेबी थाट मिळावा, या उद्देशाने हा चार्ज घेतला आहे. तर, काहींनी खासगी कामे करता यावीत म्हणून राजकीय दबाव टाकून हा चार्ज बळकाविला आहे. …
The post गुरुजींचा साहेबी थाट ! केंद्र प्रमुखासाठी राजकीय दबा appeared first on पुढारी.