संगमनेरात कॅफेवर पोलिसांचा छापा

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील अकोले बायपास रोडवरील एका अनधिकृत कॅफेवर पोलिस पथकाने छापा टाकला. कॅफेत 6 तरुण- 6 तरुणी बसलेल्या आढळल्याने शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आई-वडिलांना बोलावून समज देत सोडण्यात आले. दरम्यान, अनाधिकृत कॅफे चालविणारा कॅफे चालक अभय गवळी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. संगमनेरात मोठ्या प्रमाणात कॅफे सुरु होते. … The post संगमनेरात कॅफेवर पोलिसांचा छापा appeared first on पुढारी.

संगमनेरात कॅफेवर पोलिसांचा छापा

संगमनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शहरातील अकोले बायपास रोडवरील एका अनधिकृत कॅफेवर पोलिस पथकाने छापा टाकला. कॅफेत 6 तरुण- 6 तरुणी बसलेल्या आढळल्याने शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आई-वडिलांना बोलावून समज देत सोडण्यात आले. दरम्यान, अनाधिकृत कॅफे चालविणारा कॅफे चालक अभय गवळी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.
संगमनेरात मोठ्या प्रमाणात कॅफे सुरु होते. यामध्ये तरुण-तरुणींना बसण्यास स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. मध्यंतरी साकुर व घुलेवाडी येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या.
या घटनांसाठी जबाबदार धरून पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाक्चौरे व पो. नि. भगवान मथुरे यांनी शहरात कॅफे चालकांसह मालकांवर कारवाई केली होती. यातील 8 कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून, अटक केली होती. यानंतर काही दिवस कॅफे बंद होते.
संगमनेरात अकोले बायपास रोडवर राहणे मळ्यामध्ये अनधिकृत कॅफे सुरु झाल्याची गुप्त खबर पो. नि. भगवान मथुरे यांना मिळाली. पोलिस विशाल कर्पे, विवेक जाधव, रोहिदास शिरसाठ, महिला पोलिस घोडे यांच्या पथकासह नाव नसलेल्या कॅफेवर छापा टाकला.
कफेमध्ये महाविद्यालयीन 6 युवक व 6 युवती आढळल्या. त्यांना पोलिस ठाण्यात आणले. आई- वडिलांसमोर समज देत ताब्यात देण्यात आले.
पो. काँ. रोहिदास शिरसाठ यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी रिलॅक्स कॅफेचा चालक अभय चंद्रकांत गवळी (रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर) विरुद्ध गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पो. नि. भगवान मथुरे तपास करीत आहे.
चहा पिण्याच्या नावाखाली ‘टाईमपास..!’
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात मुला- मुलींनी शिक्षण घेऊन नोकरी करावी, या उद्देशाने आई- वडील कष्ट करून शिक्षणासाठी पाठवितात, मात्र संगमनेरला शिक्षणाच्या नावाखाली काही मुले- मुली अनाधिकृत कॅफेमध्ये चहा पिण्याच्या नावाखाली गप्पा मारीत टाईमपास करीत असल्याचे चित्र दिसते.
Latest Marathi News संगमनेरात कॅफेवर पोलिसांचा छापा Brought to You By : Bharat Live News Media.