बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच ! दुचाकीस्वारावर केला हल्ला

आळेफाटा : दुचाकीवरुन जात असलेल्या 23 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, समोरून आलेल्या ट्रक चालकाने हॉर्न वाजवल्याने बिबट्याने धूम ठोकली. यामुळे तरुण बचावला. ही घटना बेल्हा – जेजुरी महामार्गावर गुरुवारी (दि. 28) रात्री आठ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम अरुण खराडे हे आळेफाटा येथून मंगरूळ – पारगाव कडे बेल्हा येथून जात होते. त्यावेळी रात्री आठच्या सुमारास कोरडेमळा परिसरात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या शुभमने दुचाकी थांबवली. त्याचवेळी समोरून येणा-या ट्रकच्या चालकाने जोरजोरात हॉर्न वाजविल्याने बिबट्या पळून गेला. यामुळे शुभम बचावला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात बांगरवाडी येथे ऊसतोडणी मजूर जखमी झाला होता.
Latest Marathi News बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच ! दुचाकीस्वारावर केला हल्ला Brought to You By : Bharat Live News Media.
