२०२३ च्या शेवटच्या सत्रात नफावसुली, वर्षभर सेन्सेक्स, निफ्टी २० टक्क्यांपर्यंत वाढले

पुढारी ऑनलाईन : रोज नवे शिखर गाठणाऱ्या भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी २०२३ वर्षाच्या शेवटच्या सत्रात नफावसुली दिसून आली. जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान सेन्सेक्स आज १७० अंकांनी घसरून ७२,२४० वर बंद झाला. तर निफ्टी ४७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २१,७३१ वर स्थिरावला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रात आज सर्वाधिक विक्री राहिली. तर मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. भारतीय … The post २०२३ च्या शेवटच्या सत्रात नफावसुली, वर्षभर सेन्सेक्स, निफ्टी २० टक्क्यांपर्यंत वाढले appeared first on पुढारी.

२०२३ च्या शेवटच्या सत्रात नफावसुली, वर्षभर सेन्सेक्स, निफ्टी २० टक्क्यांपर्यंत वाढले

Bharat Live News Media ऑनलाईन : रोज नवे शिखर गाठणाऱ्या भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी २०२३ वर्षाच्या शेवटच्या सत्रात नफावसुली दिसून आली. जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान सेन्सेक्स आज १७० अंकांनी घसरून ७२,२४० वर बंद झाला. तर निफ्टी ४७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २१,७३१ वर स्थिरावला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रात आज सर्वाधिक विक्री राहिली. तर मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली.
भारतीय बाजाराची दमदार कामगिरी
निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्स यावर्षी अनुक्रमे २० टक्क्यांनी आणि १८ टक्क्यांनी वाढले. यामुळे भारताने २०२३ मध्ये टॉप १० सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळवले. सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलाने या वर्षी प्रथमच ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला. सध्या बाजार भांडवलाच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, २०२३ वर्षात सेन्सेक्स ११,३९९ अंकांनी वाढला. यामुळे सर्व बीएसई (BSE) सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल ८१.६ लाख कोटी रुपयांनी वाढून ३६४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
आजची सेन्सेक्सची स्थिती
सेन्सेक्स आज ७२,३५१ वर खुला झाला होता. सेन्सेक्सवर इन्फोसिस, एसबीआय, टायटन, एनटीपीसी, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले. तर टाटा मोटर्सचा शेअर आज टॉप गेनर ठरला. हा शेअर ३.४५ टक्क्यांनी वाढून ७७९ रुपयांवर पोहोचला. नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स हे शेअर्सही वाढले.

निफ्टीवर कोणते शेअर्स वाढले?
एनएसई निफ्टीवर बीपीसीएल, ओएनजीसी, एसबीआय, कोल इंडिया, इन्फोसिस हे शेअर्स घसरले. तर टाटा कन्झ्यूमरचा शेअर ४ टक्क्यांनी वाढून १,०४८ रुपयांवर पोहोचला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, बजाज ऑटो, नेस्ले इंडिया, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले.
टाटा कन्झ्यूमरचे बाजार भांडवल १ लाख कोटींवर, बनली सहावी कंपनी
टाटा कन्झ्यूमर प्रोडक्टसचा शेअर आज ४ टक्क्यांनी वाढून १,०८५ रुपयांवर पोहोचला. शेअर्समधील तेजीमुळे Tata Consumer Products चे बाजार भांडवल आज १ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. टाटा कन्झ्यूमर ही १ लाख रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा पार करणारी टाटा समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमधील सहावी कंपनी ठरली. टाटा कंझ्यूमरच्या आधी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), टायटन, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि ट्रेंटने १ लाख कोटी रुपयांचा बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये ट्रेंट अशी कामगिरी करणारी टाटा समूहाची पाचवी सूचीबद्ध कंपनी बनली होती. (Tata Consumer Products Share)
परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर
एनएसई (NSE) च्या आकडेवारीनुसार, २८ डिसेंबर रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारात लक्षणीय खरेदी केली. त्यांनी एका दिवसात ४,३५९ कोटी रुपयांचे शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) १३६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
Latest Marathi News २०२३ च्या शेवटच्या सत्रात नफावसुली, वर्षभर सेन्सेक्स, निफ्टी २० टक्क्यांपर्यंत वाढले Brought to You By : Bharat Live News Media.