
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : या वर्षातील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील शो दिवसभर दाखवली जाणार आहेत. (Maharashtrachi Hasyajatra) ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली प्रहसने पाहायला मिळणार आहेत. (Maharashtrachi Hasyajatra)
‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ मालिकेत येणार ट्विस्ट
Prathmesh Parab : प्रथमेश परब धुमाकूळ घालणार, ‘डिलिव्हरी बॉय’चे पहिले पोस्टर रिलीज
प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत नारायणन यांचे निधन
या वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही वेळ आनंद घेता यावा म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ वर्षअखेरीस संपूर्ण दिवस आपल्या भेटीस येणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहे. या जत्रेतली मंडळी प्रेक्षकांचे नवीन वर्ष हसरे करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत. ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि रात्री ९ वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी’ सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
Latest Marathi News ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना आवडलेली प्रहसने पाहता येणार Brought to You By : Bharat Live News Media.
