अर्जुन अंबाबाईच्या दर्शनाने करणार नववर्षाचं स्वागत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षाची सुरुवात आपल्या माणसांसोबत आणि देवाच्या आशीर्वादाने होईल यांहून चांगली गोष्ट काय असू शकते. झी मराठीचे कलाकार २०२४ चे स्वागत नवीन वर्ष कसे साजरा करणार आहेत, याबाबतीत काय सांगितले पाहा.
संबंधित बातम्या –
Prathmesh Parab : प्रथमेश परब धुमाकूळ घालणार, ‘डिलिव्हरी बॉय’चे पहिले पोस्टर रिलीज
Guns and Gulabs 2 : गन्स अँड गुलाब्स २ मध्ये राजकुमार राव पुन्हा पान टिपूच्या भूमिकेत
Merry Christmas movie : कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’मधील कलाकारांचा AI लूक व्हायरल
‘सारं काही तिच्यासाठी’ मधली उमा खोत म्हणजेच खुशबू तावडेने सांगितले, “मी २०२४ चे स्वागत आमच्या नवीन घरात, माझ्या पूर्ण परिवारासोबत साजरा करणार आहे. घरात आवडते पदार्थ बनवून, छान बोर्ड गेम खेळू, त्यासोबत गप्पा गोष्टी २०२३ च्या आठवणींना उजाळा देऊन आणि नवीन वर्षात काय-काय करायचे आहे, त्याबदल भरपूर चर्चा करणार.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधली श्वेत मेहेंदळे म्हणजेच इंद्राणी आपले जिवलग मित्र यश प्रधान, अपेक्षा चोक्सी आणि आपल्या परिवार सोबत नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. मी आणि माझा परिवार पुण्याला यशच्या घरी जाणार आहोत. त्याची बायको अपेक्षा हिने नवीन कार घेतली आहे आणि ती आम्हाला फिरवणार आहे. आम्ही पुण्याच्या जवळपास वेगवेगळी ठिकाणे फिरणार आहोत. मढेघाट, पाबेघाट अशी वेगवेगळी सुंदर ठिकाणे शोधून एक्सप्लोर करण्याचा आमचा प्लॅन आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील तुम्हा सर्वांचा लाडका अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने सांगितले की, मी नवीन वर्षाचं स्वागत पत्नी पूजा आणि लेकी सोबत करणार आहे. आम्ही दर वर्षी ३१ डिसेंबरला कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जातो. नवीन वर्षाचं आगमन अंबाबाईच्या दर्शनाने आणि तिच्या आशीर्वादने सुरु करणार. इतकं सुख कशातच नाही. फक्त यावर्षी आमच्यासोबत आमचं पिलू म्हणजे माझी लाडकी लेक रुई असणार आहे.
Latest Marathi News अर्जुन अंबाबाईच्या दर्शनाने करणार नववर्षाचं स्वागत Brought to You By : Bharat Live News Media.
