शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

राजगुरुनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सध्याचे केंद्र सरकार शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यात अयशस्वी ठरले आहे. जनतेच्या अडचणींना बगल देण्यासाठी त्यांनी प्रभू श्रीराम यांना पक्षीय स्थान देण्याचे कारस्थान रचले आहे. जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, अशी भाजप प्रणित सरकारवर जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सभा बुधवारी (दि. 27) सायंकाळी राजगुरुनगर येथे झाली. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते. या वेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपबरोबर जाणार्या अजित पवार व सहकारी आमदारांचा नामोल्लेख टाळून सत्तेच्या वळचणीला हळूच जाऊन बसले की लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. ताठ मानेने जगायची संधी त्यांनी गमावली, अशी टिपण्णीदेखील पाटील यांनी केली.
व्यासपीठावर आपल्यासोबत नेहमी असणारे आमदार दिलीप मोहिते पाटील आज नाही, अशी खंत व्यक्त करून त्यांची ते आहेत तिथे ससेहोलपट थांबणार का ? असा प्रश्नदेखील जयंत पाटील यांनी उपस्थित केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेश उपाध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टे पाटील, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, देवदत्त निकम, सुरेश भोर, सोमनाथ मुंगसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, युवक तालुका कार्याध्यक्ष अॅड. देविदास शिंदे, महिला जिल्हा संघटक विजया शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास धनवटे आदी प्रमुख कार्यकर्ते आणि विद्यार्थी, नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
लालन सिंह यांचा JDU अध्यक्षपदाचा राजीनामा, नितीश कुमार नवे पक्ष प्रमुख
जनतेचा आक्रोश भाजपला सत्तेवरून खाली खेचेल : खा. डॉ. अमोल कोल्हे
Latest Marathi News शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Brought to You By : Bharat Live News Media.
