गन्स अँड गुलाब्स २ मध्ये राजकुमार पुन्हा पान टिपूच्या भूमिकेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नेटफ्लिक्सने गन आणि गुलाब सीझन २ घोषणा केली. (Guns and Gulabs 2) पान टिपू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियासोबत चित्रपट निर्माते जोडी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गन्स अँड गुलाब्स या त्यांच्या प्रचंड यशस्वी गुन्हेगारी वेब सीरिजचा दुसरा सीझनची घोषणा केली आहे. (Guns and Gulabs 2)
संबंधित बातम्या –
प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत नारायणन यांचे निधन
Flash Back Tamannah Bhatia : तमन्नाने शेअर केले २०२३ मधील खास लूक्स
Captain Vijayakanth funeral : कॅप्टन विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, विजय थलापतीला..
राजकुमारसाठी यंदाच वर्ष सिनेमॅटिकमय झालं आणि या वर्षात त्याने आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील पटकावले. या वर्षी त्याची एक भूमिका गाजली आणि ती म्हणजे “पान टिपूची ” तो पुन्हा एकदा ही भूमिका पुन्हा साकारणार असल्याचं कळतंय. गन्स अँड गुलाब्स चा दुसरा सीझन कधी रिलीज होईल, हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी २०२४ च्या सुरुवातीला याचा दुसरा भाग येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजकुमार येणाऱ्या वर्षात याचं शूट सुरू करणार असल्याचं कळतंय. गन्स अँड गुलाब्सच्या दुसरा सीझन मध्ये राजकुमार राव आणि राज आणि डीके ही ड्रीम टीम तिसऱ्यांदा एकत्र दिसणार आहे. राजकुमार रावने पूर्वी सांगितले होते की, या चित्रपट निर्मात्या जोडीसोबत त्याला काम करताना आनंद होतो. कारण तो नेहमीच आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी हटके करतात आणि त्यांच्या सोबतीने काम करण्याची मज्जा वेगळी असते. पान टिपूच्या भूमिकेसाठी त्याने २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्कार जिंकला आता प्रेक्षकांना नव्या सीजनची उत्सुकता लागून राहिली आहे.
View this post on Instagram
A post shared by Rajkumar Rao (@rajkumarraofficial)
Latest Marathi News गन्स अँड गुलाब्स २ मध्ये राजकुमार पुन्हा पान टिपूच्या भूमिकेत Brought to You By : Bharat Live News Media.
