रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधींना आमंत्रण

पुढारी ऑनलाईन डेस्क: आयोध्येत सोमवारी २२ जानेवारीला राम मंदीर प्रतिष्ठापणा होत आहे. यासाठी देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसच्या देखील महत्त्वाच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे, अशी अधिकृत माहिती काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ता जयराम रमेश यांनी दिली आहे. (Ram Mandir Inauguration) काँग्रेस सरचिटणीस … The post रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधींना आमंत्रण appeared first on पुढारी.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधींना आमंत्रण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: आयोध्येत सोमवारी २२ जानेवारीला राम मंदीर प्रतिष्ठापणा होत आहे. यासाठी देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसच्या देखील महत्त्वाच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे, अशी अधिकृत माहिती काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ता जयराम रमेश यांनी दिली आहे. (Ram Mandir Inauguration)
काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे  आमंत्रण मिळाले आहे. यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि कळवले जाईल, असे देखील जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. (Ram Mandir Inauguration)

Congress president Mallikarjun Kharge and Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi have received an invitation to attend the consecration ceremony of Ram Temple on 22nd January 2024 in Ayodhya. The decision will be taken and communicated at the appropriate time:… pic.twitter.com/Medq5JWYPb
— ANI (@ANI) December 29, 2023

देशातील सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण
सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रामनाथ कोविंद यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच डी देवेगौडा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आणखी निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना निमंत्रणे मिळणार आहेत. दरम्यान, या समारंभासाठी सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे मात्र त्यात काही राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख निमंत्रितांच्या यादीत नाहीत.
सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींना आमंत्रण, काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींना या कार्यक्रमाचे सर्वात आधी निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात आली होती. देव फक्त एका पक्षाचे आहेत का असा प्रश्न विचारात सर्वांनाच निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती.
हेही वाचा:

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त १ मिनीट २४ सेकंदांचा
राम मंदिरात रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना निमंत्रण

Latest Marathi News रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधींना आमंत्रण Brought to You By : Bharat Live News Media.