चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारातील मिरगण रोड लगत असलेल्या शेतामध्ये एका युवकाचा मृतदेह सापडला होता. यासंबधी तपास केला असता या युवकाला चोर समजून काही तरुणांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील जामनेर रोडवरील … The post चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारातील मिरगण रोड लगत असलेल्या शेतामध्ये एका युवकाचा मृतदेह सापडला होता. यासंबधी तपास केला असता या युवकाला चोर समजून काही तरुणांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील जामनेर रोडवरील बी. जे जिमच्या बाजूला वांजोळा शिवारातील वांदोळा मिरगव्हाण रोड लगत असलेल्या सोनाली सुशील जैन यांच्या शेतात निंबाच्या झाडाखाली 22 डिसेंबरच्या रात्री एका युवकाचा मृतदेह मिळून आला होता. याबाबत भुसावळ तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.  मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मयत धर्मेंद्र लोधीयाला मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले.
चोर समजून केली मारहाण 
पोलिसांना मिळालेल्या माहीती नुसार मयत धर्मेंद्र महिपत लोधी राजपूत वय (29) (रा. बदोरा जिल्हा झासी उत्तर प्रदेश) हा युवक बी.जे जिमच्या बाजूला असलेल्या मनोज बुटासिंग चितोडिया यांच्या घरासमोर उभी असलेल्या कारचा दरवाजा उघडत असताना त्यास चोर समजून संशयित आरोपी जमेरी सिंग चितोडिया, पप्पू सिंग चितोडिया व यांच्यासह दोन अनोळखी इसम (राहणार केशवनगर जामनेर रोड) यांनी मयत धर्मेंद्र लोधी याला काठीने व बॅटने हाता पायाला, पाठीवर- डोक्यावर मारहाण केली होती. त्यावरून एपीआय अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप हे करीत आहेत.
हेही वाचा :

Crime news : मशीनचे साहित्य चोरणार्‍यांना बेड्या
Nashik News : जिल्हा नियोजन’वर अजित पवार गटाचा वरचष्मा, विशेष निमंत्रित सदस्यांपासून भाजप-सेना दूर
Maratha Reservation : मला अडवलं तर फडणवीसांच्या घरासमोर बसू : मनोज जरांगे पाटील

Latest Marathi News चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.