कचरा डेपोस स्थगिती दिल्याने प्रशासनाकडून कार्यवाही बंद :आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन डेपो तयार करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यासाठी वन विभागाकडून जागा खरेदी करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरूवारी (दि. 28) सांगितले. लोकसंख्येने झपाट्याने फुगत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी दुसर्‍या घनकचरा डेपो पुनावळे येथे सुरू करण्याच्या हालचाली पिंपरी-चिंचवड महापालिकेने … The post कचरा डेपोस स्थगिती दिल्याने प्रशासनाकडून कार्यवाही बंद :आयुक्त शेखर सिंह appeared first on पुढारी.

कचरा डेपोस स्थगिती दिल्याने प्रशासनाकडून कार्यवाही बंद :आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन डेपो तयार करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यासाठी वन विभागाकडून जागा खरेदी करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरूवारी (दि. 28) सांगितले. लोकसंख्येने झपाट्याने फुगत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी दुसर्‍या घनकचरा डेपो पुनावळे येथे सुरू करण्याच्या हालचाली पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केल्या.
मात्र, भरवस्तीजवळ डेपो नको, म्हणत त्याला रहिवाशांनी विरोध केला आहे. या डेपोचा मुद्दा आमदार अश्विनी जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. मंत्री उदय सामंत यांनी या कचरा डेपोस स्थगिती देत असल्याचे घोषित केले होते. पुनावळेत डेपो होणार नसल्याने त्या भागांतील रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यासंदर्भात विचारले असता, आयुक्त बोलत होते.
आयुक्त म्हणाले की, पुनावळे कचरा डेपोबाबत महापालिकेकडून कोणत्याही हालचाली होत नव्हता. महापालिकेने मुळशीतील सुचविलेली जागा वन विभागाने नकारली होती. त्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने गेल्या 7 महिन्यात सातत्याने पाठपुरावा केला. पुनावळेच्या जागेच्या बदल्यात चंद्रपूर येथील जागा देण्याबाबत कार्यवाही सुरू होती. हिवाळी अधिवेशनात पुनावळे कचरा डेपोस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने त्या संदर्भातील कार्यवाही बंद केली आहे. मात्र, शहराचा वाढता वेग लक्षात घेता येत्या 15 वर्षांत डेपोची गरज निर्माण होणार आहे. त्यावेळी हा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा 

Pimpri News : चापेकर वाडा स्मारकावर आणखी सात कोटींचा खर्च
नागपूर : ट्रकने भाऊ-बहिणीला चिरडले; जमावाने ट्रक पेटवून दिला
सावधान ! मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजाराचे प्रमाण; काय घ्याल काळजी?

Latest Marathi News कचरा डेपोस स्थगिती दिल्याने प्रशासनाकडून कार्यवाही बंद :आयुक्त शेखर सिंह Brought to You By : Bharat Live News Media.