पिंपरी : चापेकर वाडा स्मारकावर आणखी सात कोटींचा खर्च

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर वाडा बनविण्यात येत आहे. त्यावर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. आता, ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्वल, प्रोजेक्शन मॅपिंग व विविध डिजिटलायझेनसाठी तब्बल 7 कोटी खर्च करण्यात येत आहे. क्रांतिवर चापेकर स्मारक समितीच्या वतीने चापेकर वाड्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, हा खर्च महापालिका करीत आहे. विविध तीन टप्प्यात हे काम करण्यात येत आहे.
त्यासाठी महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधीचा खर्च केला आहे. तेथील ऑडिओ व व्हिडिओ प्रणाली तसेच, डिजिटलायझेशन करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने 6 कोटी 77 लाख 15 हजार 207 रुपये खर्चाची निविदा काढली होती. त्यात 4 निविदांपैकी मुव्हींग पिक्सल प्रा. लि., नोनसेन्स स्टुडीओज एलएलपी, गोबानानास या 3 निविदा पात्र ठरल्या. त्यासर्व 13 ते 17 टक्के अधिक दरांच्या आहेत. मुव्हींग पिक्सल या ठेकेदाराने सुधारित दर दिला. तो 6 कोटी 92 लाख 38 हजार 977 रुपये अशी 2.25 टक्के जादा दर आहे. तो दर स्वीकृत करून त्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. कामाची मुदत 6 महिने आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
हेही वाचा
नागपूर : ट्रकने भाऊ-बहिणीला चिरडले; जमावाने ट्रक पेटवून दिला
अभिवादनामुळे शिक्रापूर, तळेगावचा बाजार रद्द
शेतकर्यांना मिळणार वन हद्दीतील गवत ; पण आहे ही अट
Latest Marathi News पिंपरी : चापेकर वाडा स्मारकावर आणखी सात कोटींचा खर्च Brought to You By : Bharat Live News Media.
