‘अजित पवार यांना सल्ला देणाऱ्या ‘या’ नेत्याला केवळ २ टक्के’

पुढारी ऑनलाईन डेस्क: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यादरम्यान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केला. तसेच २०२४ च्या लोकसभेला शिरूर मतदार संघातून महायुतीचा एक तरी उमेदवार निवडून आणणारच असे खुले आव्हान कोल्हे यांना दिले. यानंतर अमोल कोल्हे यांच्या बाजून बोलताना त्यांच्या प्रवक्त्यांने अजितदादांनी त्यांच्या मुलाला मावळमधून निवडून आणावं असा सल्ला दिला. यानंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या … The post ‘अजित पवार यांना सल्ला देणाऱ्या ‘या’ नेत्याला केवळ २ टक्के’ appeared first on पुढारी.
‘अजित पवार यांना सल्ला देणाऱ्या ‘या’ नेत्याला केवळ २ टक्के’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यादरम्यान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केला. तसेच २०२४ च्या लोकसभेला शिरूर मतदार संघातून महायुतीचा एक तरी उमेदवार निवडून आणणारच असे खुले आव्हान कोल्हे यांना दिले. यानंतर अमोल कोल्हे यांच्या बाजून बोलताना त्यांच्या प्रवक्त्यांने अजितदादांनी त्यांच्या मुलाला मावळमधून निवडून आणावं असा सल्ला दिला. यानंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. (Amol Mitkari on Amol kolhe)
Amol Mitkari on Amol kolhe: अजितदादांनी मुलाला मावळमधून निवडून आणावं
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खासदार कोल्हे साहेब आपल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपीय सभा झाली. या सभेत कुणी “झाकणझुल्या” अजितदादांनी स्वतःच्या मुलाला मावळमधून निवडून आणावं असा सल्ला देत होते. पण २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ह्याला शिरूर मतदारसंघात जनतेने दाखवलेली लायकी बघा अशी टीका शरद पवार गटाच्या प्रवक्त्यावर केली आहे. (Amol Mitkari on Amol kolhe)
विकास लवांडे यांनी शिरूर मतदारसंघात केवळ २ टक्के मते
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रवक्ता विकास लवांडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी मिटकरी यांनी लवांडे यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात जनतेने केवळ २४८६ इतकी मते दिल्याचे म्हणत, एकूण मताच्या केवळ २ टक्के मते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विकास लवांडे यांच्यावर केली आहे. (Amol Mitkari on Amol kolhe)

खासदार कोल्हे साहेब आपल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपीय सभेत परवा कुणी “झाकणझुल्या” अजितदादांनी स्वतःच्या मुलाला मावळमधून निवडून आणावं असा सल्ला देत होता 2009 साली ह्याला शिरूर विधानसभेत जनतेने दाखवलेली लायकी बघा अवघी 2486 मते – एकूण मतांच्या २% 😄@kolhe_amol pic.twitter.com/hUyevLcpk5
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 29, 2023

हेही वाचा:

Supriya Sule on Government | लोकसभेत काल्पनिक गोष्टी सत्तेतील सरकार बोलते, आम्ही नाही- खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
Amol Kolhe on Government | देशातील सरकार एक फूल, दोन डाउनफूल; खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Latest Marathi News ‘अजित पवार यांना सल्ला देणाऱ्या ‘या’ नेत्याला केवळ २ टक्के’ Brought to You By : Bharat Live News Media.