निलंबन झाले तरी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आवाज उठविणारच : खा. सुप्रिया सुळे

दौंड : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेतून आमचे निलंबन झाले तरी आम्ही केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात आवाज उठविणारच असे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दौंड शहरात शुक्रवारी(दि. २९) खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली हिंद टॉकीज ते संविधान चौक असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. ‘केंद्र … The post निलंबन झाले तरी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आवाज उठविणारच : खा. सुप्रिया सुळे appeared first on पुढारी.

निलंबन झाले तरी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आवाज उठविणारच : खा. सुप्रिया सुळे

दौंड : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभेतून आमचे निलंबन झाले तरी आम्ही केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात आवाज उठविणारच असे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दौंड शहरात शुक्रवारी(दि. २९) खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली हिंद टॉकीज ते संविधान चौक असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. ‘केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी व शेतकऱ्यांना कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण आखावे.

मोदी सरकारचे शेती धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवला म्हणून आम्हाला लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. परंतु, आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आम्ही आवाज उठवणार आहोत.
द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या अवकाळी पावसामुळे प्रचंड अडचणीत आला आहे, त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मागील वर्षीचे देखील त्याला अनुदान मिळाले नाही व कोणतीही भरपाई सरकारने दिली नाही. दुष्काळ ,अवकाळी पावसाचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी नवे पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित धोरण लागू करून शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे.
मोदी सरकार शेतकऱ्यांची लूट करत आहे. या आक्रोश मोर्चामध्ये दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, सचिन गायकवाड, रामभाऊ फूले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते
Latest Marathi News निलंबन झाले तरी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आवाज उठविणारच : खा. सुप्रिया सुळे Brought to You By : Bharat Live News Media.