भाताचे अतिसेवन टाळा

भारतात बहुतेक ठिकाणी तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे बहुतेक सर्वाना भात प्रिय आहे. हल्ली रात्रीच्या जेवणात भात टाळला जातो. पण दुपारच्या जेवणात भाताचा समावेश असतोच. भात खाल्ल्याने पोट भरते; मात्र भूकही खूप लवकर लागते. भाताचे अतिसेवन शरीरासाठी वाईट ठरू शकते, कसे ते पाहूया मधुमेह एक वाटी भातामध्ये दहा चमचे उष्मांक असतात. त्यामुळे रोजच भाताचे सेवन हे … The post भाताचे अतिसेवन टाळा appeared first on पुढारी.

भाताचे अतिसेवन टाळा

डॉ. भारत लुणावत

भारतात बहुतेक ठिकाणी तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे बहुतेक सर्वाना भात प्रिय आहे. हल्ली रात्रीच्या जेवणात भात टाळला जातो. पण दुपारच्या जेवणात भाताचा समावेश असतोच.
भात खाल्ल्याने पोट भरते; मात्र भूकही खूप लवकर लागते. भाताचे अतिसेवन शरीरासाठी वाईट ठरू शकते, कसे ते पाहूया
मधुमेह
एक वाटी भातामध्ये दहा चमचे उष्मांक असतात. त्यामुळे रोजच भाताचे सेवन हे मधुमेह्यांसाठी लाभदायक मानले जात नाही.
स्थूलपणा
भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप अधिक असते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
अति आहार
भात खाल्ल्याने पोट लवकर भरते; पण भात लवकर पचत असल्याने पोट लवकर हलके होते. त्यामुळे सतत भूक लागत राहते. सतत आहार घेत राहिल्यामुळे वजन वाढण्याबरोबरच रक्तशर्कराही वाढत राहते.
पोषक घटक कमी
पांढर्‍या तांदळात पोषक घटकांची उणीव असते. त्यामुळे फक्त भाताच्या सेवनाने शरीराला गरजेची जीवनसत्त्वे आणि पोषक घटक मिळत नाहीत.
कमजोर हाडे
पांढर्‍या भातात सी जीवनसत्त्वाची कमतरता असते. त्यामुळे हाडांच्या विकासासाठी त्याचा काहीच फायदा होत नाही.
पचनशक्तीत अडचण
पांढर्‍या तांदळात तंतुमय पदार्थही कमी असतात. त्यामुळे असा तांदूळ अधिक प्रमाणात खाल्ला तर पचनशक्ती कमजोर होते.
Latest Marathi News भाताचे अतिसेवन टाळा Brought to You By : Bharat Live News Media.