देव-दानव युद्धात 2412 दानवांचा पराभव ; वाचा काय आहे प्रकरण

कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा :  देव-दानव युद्धासाठी राज्यात प्रसिद्ध असलेली कुसेगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री भानोबा देवाचा दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. देव-दानव युद्धात एकूण 2 हजार 412 दानवांचा पराभव देवाने केला. तर ग्रामस्थ, यात्रा कमिटी, भानोबा तरुण मंडळ व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन केल्याने 4 लाखांहून अधिक भाविकांंनी यात्रोत्सवास … The post देव-दानव युद्धात 2412 दानवांचा पराभव ; वाचा काय आहे प्रकरण appeared first on पुढारी.

देव-दानव युद्धात 2412 दानवांचा पराभव ; वाचा काय आहे प्रकरण

कुसेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा :  देव-दानव युद्धासाठी राज्यात प्रसिद्ध असलेली कुसेगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री भानोबा देवाचा दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. देव-दानव युद्धात एकूण 2 हजार 412 दानवांचा पराभव देवाने केला. तर ग्रामस्थ, यात्रा कमिटी, भानोबा तरुण मंडळ व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन केल्याने 4 लाखांहून अधिक भाविकांंनी यात्रोत्सवास हजेरी लावली. पहिल्या दिवशी बुधवारी (दि. 27) देव-दानव युद्धात 1 हजार 137 दानवांचा पराभव देवाने केला. तर दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 28) युद्धात देवाने 1 हजार 275 दानवांचा पराभव केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची यात्रा रेकॉर्डब्रेक ठरली. जवळपास चार लाखांहून अधिक भाविकांनी यात्रेत सहभाग घेत देवाचे दर्शन घेतले.
देवाचे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरुवारी सकाळी 8 वाजता देवाची कथा पोवाड्यातून भाविकांना सांगण्यात आली. तर दुपारी 3 वाजता कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला. अखेरच्या मानाच्या कुस्तीला 51 हजार रुपये, चांदीची गदा बक्षीस देण्यात आले. तर विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा दोन दिवस कार्यक्रम झाला. भाविकांना देवाची माहिती, इतिहास तसेच आख्यायिका उत्तम रुपनवर, मनेश शितोळे, हनुमंत शितोळे या निवेदकांनी सांगितली. देव-दानव युद्धात पाटस, पडवी, बिरोबावाडी, रोटी परिसरातील तरुणांनी सहकार्य केले. यवत पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला.
हेही वाचा :

Pune Crime News : येरवडा कारागृहात कैद्याचा खून : चार कैद्यांविरुद्ध गुन्हा
BJP Lok Sabha poll song | मोदी पुन्हा येतील! भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी लाँच केले गाणे (व्हिडिओ)

Latest Marathi News देव-दानव युद्धात 2412 दानवांचा पराभव ; वाचा काय आहे प्रकरण Brought to You By : Bharat Live News Media.