नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीवर सात विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा (अजित पवार गट) वरचष्मा राहिला आहे. भाजप व शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याचे यात नाव नसल्याने दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील सत्तातरांस दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना जिल्हा स्तरावर नियोजन समित्यांवरील २० विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या … The post नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा appeared first on पुढारी.

नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा; राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीवर सात विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा (अजित पवार गट) वरचष्मा राहिला आहे. भाजप व शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याचे यात नाव नसल्याने दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे.
राज्यातील सत्तातरांस दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना जिल्हा स्तरावर नियोजन समित्यांवरील २० विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर गेल्या महिन्यात पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या माध्यमातून विशेष निमंत्रितांची २० नावांची यादी राज्य शासनाला सादर केली. पहिल्या टप्प्यामध्ये शासनाने सात विशेष निमंत्रितांची नावे घोषित केलीत. ही सर्व नावे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कोट्यातील असल्याचे समोर आले. वास्तविक राज्याच्या सत्तेत तीन पक्ष एकत्रित असताना नाशिकचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे आहे. अशा परिस्थितीत नियोजन समितीवरील नियुक्तीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘दादागिरी’ दिसून आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
या निमंत्रितांची नियुक्ती
जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पगार, रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र भामरे, बाळासाहेब म्हस्के, केरू खतेले, सुरेश खोडे या सदस्यांची नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा :

Virat Kohli Record | विराटचा आणखी एक विक्रम! ठरला क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू
पुरुषोत्तम करंडक स्पर्धा : महाअंतिम फेरीत युवकांनी जिंकली मने
‘व्यसन टाळा, स्वच्छतेचे नियम पाळा’ : डॉ. रमण गंगाखेडकर यांचा संदेश

Latest Marathi News नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा Brought to You By : Bharat Live News Media.