मोठा निर्णय! शिक्षण संस्था स्थापन करु शकतात समूह विद्यापीठे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १७) राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्याची अर्थव्यवस्था, शिक्षण, योजना आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करण्याबाबत चर्चा देखील करण्यात … The post मोठा निर्णय! शिक्षण संस्था स्थापन करु शकतात समूह विद्यापीठे appeared first on पुढारी.

मोठा निर्णय! शिक्षण संस्था स्थापन करु शकतात समूह विद्यापीठे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १७) राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्याची अर्थव्यवस्था, शिक्षण, योजना आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करण्याबाबत चर्चा देखील करण्यात आली. यासह अन्य काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
दिवाळीनंतर आज (दि. १७) पार पडलेल्या मंत्रालयातील बैठकीमध्ये राज्यातील 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेला मुदतवाढ देण्यात आली. त्याचबरोबर 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी देखील करण्यात आल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय

मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार (जलसंपदा विभाग)
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
( ग्रामविकास विभाग)
आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
( उच्च व तंत्रशिक्षण)
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :
✅ मंगरूळपीर… pic.twitter.com/ThT15GE7Q5
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 17, 2023

हेही वाचा

‘फोडाफोडीत लक्ष देणार्‍या केंद्राचा व्यापारी धोरणांशी संवाद नाही’ : शरद पवार

The post मोठा निर्णय! शिक्षण संस्था स्थापन करु शकतात समूह विद्यापीठे appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १७) राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्याची अर्थव्यवस्था, शिक्षण, योजना आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करण्याबाबत चर्चा देखील करण्यात …

The post मोठा निर्णय! शिक्षण संस्था स्थापन करु शकतात समूह विद्यापीठे appeared first on पुढारी.

Go to Source