मोदी पुन्हा येतील! भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी लाँच केले गाणे (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन : भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी “फिर आएगा मोदी” (मोदी पुन्हा येतील) असे थीम असणारे व्हिडिओ गाणे लाँच केले आहे. गुरुवारी भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १० मिनिटांच्या लाँच केलेल्या व्हिडिओ गाण्यात मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत पूर्ण केलेल्या आश्वासनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात अयोध्येत राम मंदिराची उभारणी, जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० … The post मोदी पुन्हा येतील! भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी लाँच केले गाणे (व्हिडिओ) appeared first on पुढारी.

मोदी पुन्हा येतील! भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी लाँच केले गाणे (व्हिडिओ)

Bharat Live News Media ऑनलाईन : भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी “फिर आएगा मोदी” (मोदी पुन्हा येतील) असे थीम असणारे व्हिडिओ गाणे लाँच केले आहे. गुरुवारी भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १० मिनिटांच्या लाँच केलेल्या व्हिडिओ गाण्यात मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत पूर्ण केलेल्या आश्वासनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात अयोध्येत राम मंदिराची उभारणी, जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे, उज्ज्वला योजना, जनधन योजना, किसान सन्मान, मोफत धान्य पुरवठा आणि कल्याणकारी आणि पायाभूत सुविधा विकासाव्यतिरिक्त तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या मुद्याचाही उल्लेख केला आहे. (BJP Lok Sabha poll song)
संबंधित बातम्या 

नितीशकुमार अडकले चक्रव्यूहात
पंतप्रधान मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर; विमानतळाचे करणार उद्घाटन
पुतिन यांनी PM मोदींना दिले रशिया भेटीचे निमंत्रण

”बजेगा डंका, काम के दम का! राम जी देंगे सद्बुद्धि, फिर आएगा मोदी। मोदी एक व्यक्ति नहीं है, देश का है वो सम्मान, १४० करोड़ लोगों की आशाओं की है पहचान। फिर आएगा, फिर आएगा मोदी।” असे या गाण्याचे बोल आहेत.
या व्हिडिओची सुरुवात त्यांच्या मंदिर भेटी, नवीन संसद भवनात सेंगोलची स्थापना आणि भारत आणि परदेशातील त्यांच्या सार्वजनिक संवादाने होते. भाजपने या गाण्यातून विरोधकांच्या INDIA आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘कितना भी चाहे झूठ फैला लें, मिलकर सारे घमंडी! फिर आएगा मोदी! असा गाण्यात उल्लेख आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये नुकत्याच झालेल्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आणखी वाढला आहे. यामुळे पक्षाच्या रणनीतीकारांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयाची खात्री आहे. (BJP Lok Sabha poll song)
जवाहरलाल नेहरू हे आतापर्यंत सलग तीन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत. आता २०२४ मध्ये भाजपने बाजी मारल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील. भाजपचा निवडणूक प्रचार हा प्रो-इन्कम्बन्सीच्या मुद्द्यावर असणार आहे.

बजेगा डंका, काम के दम का!
राम जी देंगे सद्बुद्धि, फिर आएगा मोदी।
मोदी एक व्यक्ति नहीं है, देश का है वो सम्मान,
140 करोड़ लोगों की आशाओं की है पहचान।
फिर आएगा, फिर आएगा मोदी। pic.twitter.com/mcdTElq2ru
— BJP (@BJP4India) December 28, 2023

Latest Marathi News मोदी पुन्हा येतील! भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी लाँच केले गाणे (व्हिडिओ) Brought to You By : Bharat Live News Media.