बापू भाडळे, उमेश हरपळेंचा गाडा ठरला नामदार केसरी

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या संकल्पनेतून श्रीदत्त जयंती उत्सवानिमित्त ओपन मैदानातील भव्य दिव्य राज्यस्तरीय नामदार केसरी 2023 बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात बापू भाडळे व उमेश हरपळे (फुरसुंगी) यांनी नामदार केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक जिंकत 1 लाख 21 हजार 111 रुपये, चषक, ट्रॉफी असे बक्षीस जिंकले. सासवड … The post बापू भाडळे, उमेश हरपळेंचा गाडा ठरला नामदार केसरी appeared first on पुढारी.

बापू भाडळे, उमेश हरपळेंचा गाडा ठरला नामदार केसरी

सासवड : Bharat Live News Media वृत्तसेवा :  माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या संकल्पनेतून श्रीदत्त जयंती उत्सवानिमित्त ओपन मैदानातील भव्य दिव्य राज्यस्तरीय नामदार केसरी 2023 बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात बापू भाडळे व उमेश हरपळे (फुरसुंगी) यांनी नामदार केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक जिंकत 1 लाख 21 हजार 111 रुपये, चषक, ट्रॉफी असे बक्षीस जिंकले.
सासवड (ता. पुरंदर) येथील वाघडोंगर, पेशवे मैदानावर ही स्पर्धा झाली. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप यादव, महिला आघाडीच्या नेत्या डॉ. ममता शिवतारे लांडे, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार हंबीर, उपजिल्हाप्रमुख रमेश इंगळे, उपजिल्हाप्रमुख अतुल म्हस्के, युवासेना उपजिल्हाप्रमुख मंदार जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, निवडणूक प्रमुख सचिन भोंगळे, युवासेना तालुकाप्रमुख अ‍ॅड. नितीन कुंजीर, कार्याध्यक्ष भूषण ताकवले, महिला शहराध्यक्षा विद्या टिळेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत आई तुळजा भवानी कु. श्रुष्टी प्रिया गौतम काकडे (निंबुत) द्वितीय, भैरवनाथ बापूशेठ भडळे, उमेशशेठ हरपळे (फुरसुंगी) तृतीय, श्रीनाथ बापू आंबेकर (वडकी) चतुर्थ, ओम साई राम अमित दादा खुटवड पाचवा, नील गणेश जगताप (पणदरे) सहावा, पै. सार्थक बाबाराजे जगताप (सासवड) यांनी सातवा क्रमांक पटकाविला. फायनलसाठी प्रत्येकी 1 ते 6 नंबरला रोख रक्कम चषक, ट्रॉफी देण्यात आली. शर्यतीमध्ये 495 बैलगाडांचे स्पर्धक सहभागी झाले होते. पंच म्हणून बाबाराजे जगताप, संतोष मोडक, पोपट भामे, पांडुरंग घिसरे, पिंटू जगदाळे, दादा थोपटे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन शहराध्यक्ष मिलिंद इनामके, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अविनाश बडदे, युवासेना कार्याध्यक्ष मंगेश भिंताडे यांनी केले. समालोचन प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर यांनी केले. या वेळी श्रीकांत टिळेकर, सागर मोकाशी, विनोद धुमाळ, अनिल झेंडे, स्वराज जगताप, अंकुर शिवरकर, अमित झेंडे, पोपट खेंगरे, नीलेश होले, विशाल लवांडे, राजेंद्र टकले, बापू धनवडे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :

Captain Vijayakanth funeral : कॅप्टन विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, विजय थलापतीला..
Supriya Sule on Government | लोकसभेत काल्पनिक गोष्टी सत्तेतील सरकार बोलते, आम्ही नाही- खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

Latest Marathi News बापू भाडळे, उमेश हरपळेंचा गाडा ठरला नामदार केसरी Brought to You By : Bharat Live News Media.