‘माझे हृदय तुटले आहे, विजयकांत यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती..’

पुढारी ऑनलाईन डेस्क : डीएमडीके प्रमुख विजयकांत यांच्या जाण्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्यासारखा नेता आणि अभिनेता कोणीच नव्हता. (Rajinikanth) अशी भावना साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केली. ते तुतीकोरीन विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, माझे हृदय तुटले आहे, त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती होती. (Rajinikanth) संबंधित बातम्या –  Captain Vijayakanth funeral : कॅप्टन … The post ‘माझे हृदय तुटले आहे, विजयकांत यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती..’ appeared first on पुढारी.
‘माझे हृदय तुटले आहे, विजयकांत यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती..’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : डीएमडीके प्रमुख विजयकांत यांच्या जाण्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्यासारखा नेता आणि अभिनेता कोणीच नव्हता. (Rajinikanth) अशी भावना साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केली. ते तुतीकोरीन विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, माझे हृदय तुटले आहे, त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती होती. (Rajinikanth)
संबंधित बातम्या – 

Captain Vijayakanth funeral : कॅप्टन विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, विजय थलापतीला..

Madhuri Dixit : अंधाराला उजेडाचं सापडू दे दार रं…; माधुरीच्या ‘पंचक’ चे गाणे रिलीज (video)

Srimad Ramayana : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेच्या टीमने अयोध्येला दिली भेट

அவருடன் பணியாற்றிய, பேசிப்பழகிய, சேர்ந்து சாப்பிட்ட நாட்கள் மறக்க முடியாதவை…
யார் என்ன கேட்டாலும் இல்லை என்று அவர் சொன்னதே இல்லை..
கடைக்கோடி மக்கள் வரை உதவி செய்து புரட்சிக் கலைஞனாக உயர்ந்த அண்ணன் விஜயகாந்த் அவர்களின் மறைவிற்கு ஆழ்ந்த இரங்கல்!! pic.twitter.com/PHeqHNG3uk
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) December 28, 2023
तुतीकोरीन विमानतळावरून प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले, “माझ्या हृदयाला वेदना होत आहेत. विजयकांत प्रचंड इच्छाशक्ती असलेला माणूस होता. शेवटी, मी त्यांना डीएमडीकेच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये पाहिले आणि मला वाटले की, ते त्यांच्या प्रकृतीशी संबंधित समस्यांशी झुंज देऊन परत येतील. पण त्यांचे निधन झाले. तामिळनाडूच्या जनतेचे मोठे नुकसान आहे.
ते पुढे म्हणाले, “जर ते निरोगी असते तर ते राजकारणातील एक जबरदस्त शक्ती बनले असते. त्यांनी लोकांसाठी खूप चांगली कामे केली असती. तामिळनाडूच्या लोकांनी आता त्यांना गमावले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”
साऊथ अभिनेता सूर्याने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणाला की, त्यांच्यासोबत काम करणे, बोलणे, खाणे हे दिवस अविस्मरणीय आहेत…त्यांनी कधीही कोणाला नाही म्हटले नाही. करोडो लोकांना मदत करून क्रांतिकारी कलाकार म्हणून उदयास आलेले भाऊ विजयकांत यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण शोक!!
दरम्यान, रजनीकांत यांनी विजयकांत यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विजयकांत यांच्य कुटुंबीयांची सांत्वना केली.

#WATCH | Tamil Nadu: Actor Rajinikanth pays tribute to DMDK chief and Actor Captain Vijayakanth at Island ground, Anna Salai in Chennai.
DMDK chief Captain Vijayakanth passed away at a hospital in Chennai yesterday. pic.twitter.com/EcZZ6eR7wm
— ANI (@ANI) December 29, 2023

Latest Marathi News ‘माझे हृदय तुटले आहे, विजयकांत यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती..’ Brought to You By : Bharat Live News Media.