जळगाव : महाड येथे 2 लाख 24 हजारांची घरफोडी
जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; चाळीसगाव तालुक्यातील महाड येथे घराचे कुलूप तोडून दोन लाख 24 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन अज्ञात चोटे पसार झाले. याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बहार येथे राहणारे कल्पेश संजय सूर्यवंशी (दि. 16) बाहेर गेले असता भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घराला लावलेले कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. जाताना चावी पुन्हा त्याच जागी लावून पसार झाले. याप्रकरणी कल्पेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुनबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहे.
हेही वाचा ;
Sangali News: आता गाफील राहून चालणार नाही; जरांगे-पाटलांचे सांगलीच्या सभेतून मराठ्यांना आवाहन
अमरावती : गुन्हेगारांची टोळी वर्षभरासाठी हद्दपार; पोलीस अधिक्षकाची कारवाई
The post जळगाव : महाड येथे 2 लाख 24 हजारांची घरफोडी appeared first on पुढारी.
जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; चाळीसगाव तालुक्यातील महाड येथे घराचे कुलूप तोडून दोन लाख 24 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन अज्ञात चोटे पसार झाले. याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बहार येथे राहणारे कल्पेश संजय सूर्यवंशी (दि. 16) बाहेर गेले असता भर दिवसा अज्ञात …
The post जळगाव : महाड येथे 2 लाख 24 हजारांची घरफोडी appeared first on पुढारी.