राज्यात ७६ हजार साैरकृषीपंप अस्थापित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्य शासनाने १ लाख चार हजार 823 सौर कृषि पंपाना मान्यता दिली आहे. महाऊर्जामार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करताना आतापर्यंत 75 हजार 778 सौर कृषिपंप आस्थापित केले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत जुलै 2019 व राज्य शासनाच्या १ २०२१ नुसार पंतप्रधान कुसुम-१ योजना राबविण्यात येत … The post राज्यात ७६ हजार साैरकृषीपंप अस्थापित appeared first on पुढारी.

राज्यात ७६ हजार साैरकृषीपंप अस्थापित

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्य शासनाने १ लाख चार हजार 823 सौर कृषि पंपाना मान्यता दिली आहे. महाऊर्जामार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करताना आतापर्यंत 75 हजार 778 सौर कृषिपंप आस्थापित केले आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत जुलै 2019 व राज्य शासनाच्या १ २०२१ नुसार पंतप्रधान कुसुम-१ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होण्यासाठी कृषी वापरासाठी पारेषण विरहित 3, 5 व 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप 90 ते 95 टक्के अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येतात.
महाऊर्जाने ही योजना राबविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जांची छाननी, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरणे व पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा दिली आहे, असे महाउर्जामार्फत कळविले आहे.
खोट्या मॅसेजपासून सावधान
सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के व अनुसूचित जाती, अनुसूचति जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस (SMS) पाठविण्यात येतो. योजनेत अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्णत: ऑनलाईन आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाने लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे एसएमएस आल्यास त्यापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाऊर्जाकडून शेतकऱ्यांना केले आहे.
हेही वाचा :

Amol Kolhe on Government | देशातील सरकार एक फूल, दोन डाउनफूल; खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
स्वतःचे ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ घेऊन फिरतो ‘हा’ प्राणी
सोन्याच्या हॉटेलची जगाला अपूर्वाई

Latest Marathi News राज्यात ७६ हजार साैरकृषीपंप अस्थापित Brought to You By : Bharat Live News Media.