Covid 19 : कोरोनावरील उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येवर नियंत्रण, उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा कोरोना विषाणूच्या जेएन-1 व्हेरींयटचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता टास्क फोर्सची पुनर्रचना … The post Covid 19 : कोरोनावरील उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना appeared first on पुढारी.

Covid 19 : कोरोनावरील उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येवर नियंत्रण, उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा कोरोना विषाणूच्या जेएन-1 व्हेरींयटचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिली.
अध्यक्षस्थानी डॉ. रमण गंगाखेडकर, तर सदस्यपदी नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी. जे. मेडिकल कॉलेजमधील डॉ. राजेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
हेही वाचा

‘व्यसन टाळा, स्वच्छतेचे नियम पाळा’ : डॉ. रमण गंगाखेडकर यांचा संदेश
वस्तुसंग्रहालयांशी वाढला संवाद; ऐतिहासिक वस्तूं पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
मागोवा 2023 : हेरगिरी, इसिस मॉड्यूल, ललित पाटीलने गाजले वर्ष

Latest Marathi News Covid 19 : कोरोनावरील उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची स्थापना Brought to You By : Bharat Live News Media.