Weather Update : तापमान 10 अंशांवर ; सायंकाळच्या गारठ्यात घट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढगाळ वातावरणामुळे शहरातील गार वार्‍यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमान 10 ते 12 अंशांवर असूनही थंडी कमी जाणवत आहे. या बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला या आजारांनी हैराण केले आहे. आगामी चार ते पाच दिवस शहरात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे बुधवारपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. … The post Weather Update : तापमान 10 अंशांवर ; सायंकाळच्या गारठ्यात घट appeared first on पुढारी.

Weather Update : तापमान 10 अंशांवर ; सायंकाळच्या गारठ्यात घट

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ढगाळ वातावरणामुळे शहरातील गार वार्‍यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमान 10 ते 12 अंशांवर असूनही थंडी कमी जाणवत आहे. या बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला या आजारांनी हैराण केले आहे.
आगामी चार ते पाच दिवस शहरात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे बुधवारपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. शहराचे किमान तापमान 12.1 अंशांवर असूनही सायंकाळच्या गारठ्यात किंचित घट जाणवत आहे.
पहाटे मात्र पहाटे 4 ते सकाळी 7 पर्यंत कडाक्याची थंडी अजूनही जाणवत आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने शहरात अंशत: ढगाळ वातावरण आहे. 2 जानेवारीपर्यंत असेच वातावरण राहणार आहे.
ढगांमुळे शीतलहरींना अटकाव निर्माण झाल्याने सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास गारठणारे शहर किंचित उबदार जाणवू लागले आहे.
पुणे शहर व परिसर

शिवाजीनगर: 243 (खराब)
सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ रस्ता : 234 (खराब)
म्हाडा कॉलनी, लोहगाव  229 (खराब)
कात्रज डेअरी : 119 9 (मध्यम)
कर्वे रस्ता : 76 (चांगली)

चार महानगरांची स्थिती

दिल्ली : रेडअलर्ट (खूप खराब)
पुणे : येलो अलर्ट (मध्यम)
मुंबई : ऑरेंज अलर्ट (खराब)
अहमदाबाद : येलो अलर्ट (मध्यम)

हेही वाचा

Corona Update : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे टास्क फोर्सचे निर्देश
मागोवा 2023 : हेरगिरी, इसिस मॉड्यूल, ललित पाटीलने गाजले वर्ष
प्राचीन युरोपमधील लोक बोटं कापून करीत अर्पण

 
Latest Marathi News Weather Update : तापमान 10 अंशांवर ; सायंकाळच्या गारठ्यात घट Brought to You By : Bharat Live News Media.