अखेर सुनील केदार मध्यवर्ती कारागृहात 

नागपूर पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गुरुवारी (दि.२८) एकीकडे काँग्रेसची सभा आटोपली दुसरीकडे सायंकाळी सर्व अहवाल व्यवस्थित येताच त्यांना डॉक्टरांनी सुटी दिली व त्यांची पोलीस वाहनातून कारागृहात रवानगी करण्यात आली. (Sunil Kedar) Sunil Kedar : टांगती तलवार कायम माजी … The post अखेर सुनील केदार मध्यवर्ती कारागृहात  appeared first on पुढारी.

अखेर सुनील केदार मध्यवर्ती कारागृहात 

नागपूर Bharat Live News Media वृत्तसेवा :  काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गुरुवारी (दि.२८) एकीकडे काँग्रेसची सभा आटोपली दुसरीकडे सायंकाळी सर्व अहवाल व्यवस्थित येताच त्यांना डॉक्टरांनी सुटी दिली व त्यांची पोलीस वाहनातून कारागृहात रवानगी करण्यात आली. (Sunil Kedar)
Sunil Kedar : टांगती तलवार कायम
माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून शिक्षेला स्थगिती व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आल्यावर गुरुवारी  (दि.२८)  काय होणार याविषयी उत्सुकता होती. मात्र निर्णय आता 30 डिसेंबरपर्यँत पुढे गेला आहे.  शिक्षेला स्थगिती संदर्भात दोन्ही बाजूनी युक्तिवाद  पूर्ण झाल्यानंतरही  निर्णय शनिवारपर्यंत (दि.३०) पुढे  गेला आहे. यामुळे जेएमएफसी कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर  जिल्हा सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती, जामीन देणार का, केदार यांना आमदारकी बहाल होणार का याविषयी टांगती तलवार कायम आहे. 152 कोटींच्या रोखे घोटाळा प्रकरणी  शिक्षेनंतर विलंब झाल्यामुळे त्यादिवशी अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्यात. त्यामुळे  मंगळवार २६ डिसेंबरला सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एस. भोसले (पाटील) यांच्या न्यायालयापुढे केदार यांच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. आता न्यायालय या अर्जावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा 

PM Modi Visit Ayodhya : PM मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर; विमानतळ, स्टेशन, ट्रेनचे करणार उद्घाटन
Indian Sailors In Qatar : कतार न्यायालयाचा भारतीय नौसैनिकांना दिलासा, मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती

Latest Marathi News अखेर सुनील केदार मध्यवर्ती कारागृहात  Brought to You By : Bharat Live News Media.