अमेरिकेत अपघातात सहा भारतीयांचा मृत्यू

ह्यूस्टन, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन मुलांसह भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मूळ आंध्रप्रदेशातील असून, मुम्मीदीवरमचे आमदार पी. वेंकट सतीश कुमार यांचे नातेवाईक आहेत. हा अपघात जॉनसन काऊंटीमध्ये एक व्हॅन आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने घडला. व्हॅनमधून आंध्रप्रदेशातील अमलापुरम शहरातील एका कुटुंबातील सात जण प्रवास करत होते. अपघातात केवळ लोकेश पोटाबाथुला (वय 43) नावाची व्यक्ती बचावली आहे.
लोकेश गंभीर जखमी आहे. रूशिल बेरी (28) असे व्हॅन मृत चालकाचे नाव असून, लोकेश यांची पत्नी नवीना पोटाबाथुला (36), त्यांची मुले कार्तिक (10) व निशिधा (9) आणि वडील नागेश्वर पोन्नाडा (64) आणि आई सीता महालक्ष्मी (60) अशी मृतांची नावे आहेत. ट्रक काऊंटी रोडवरून जात असताना मिनी व्हॅनवर येऊन धडकला आणि अपघात झाला. यावेळी वृद्ध दाम्पत्य आणि दोन्ही लहान मुलांनी सीटबेल्ट घातले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Latest Marathi News अमेरिकेत अपघातात सहा भारतीयांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
