‘एनआयओएस’कडून दहावी-बारावीचा निकाल जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ‘एनआयओएस’च्या अधिकृत ीर्शीीश्रीीं. पळेी. रल. ळप या वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने दहावी व बारावीच्या परीक्षा 3 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत … The post ‘एनआयओएस’कडून दहावी-बारावीचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

‘एनआयओएस’कडून दहावी-बारावीचा निकाल जाहीर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ‘एनआयओएस’च्या अधिकृत ीर्शीीश्रीीं. पळेी. रल. ळप या वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने दहावी व बारावीच्या परीक्षा 3 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत घेतल्या होत्या.
दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे लॉगिन तपशील वापरू शकतात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे मार्कशीट, प्रमाणपत्र त्यांच्या संबंधित प्रादेशिक केंद्रांद्वारे प्राप्त होईल. संबंधित प्रादेशिक केंद्र ही कागदपत्रे संबंधित व्यक्तींना त्यांच्या निवासी पत्त्यावर पाठवेल, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सीएसईईटी 6 जानेवारीला
कंपनी सचिव अभ्यासक्रम राबविणार्‍या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (सीएसईईटी) 6 जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. संगणकीय पद्धतीने होणार्‍या या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. आयसीएसआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कंपनी सचिव अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीएसईईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
या परीक्षेत चार विषय आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटे असतील. संगणकाद्वारे प्रॉक्टर्ड पद्धतीने ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा तत्सम साधनाचा वापर करून त्यांच्या सोयीच्या ठिकाणाहून परीक्षा देणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अर्धा तास लॉग इन करावे लागणार आहे. या परीक्षेला नकारात्मक गुणदान पद्धती लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना https:// icsi. edu/ या संकेतस्थळाद्वारे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
11 मार्चपासून सीयूईटी-पीजी परीक्षा
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण अर्थात एनटीएतर्फे देशभरातील विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा 2024 (सीयूईटी-पीजी) ही परीक्षा 11 ते 28 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या 24 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. एनटीएने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे सोयीचे होण्यासाठी सीयूईटी-पीजी ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते.
या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरांतील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 24 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर 25 जानेवारीपर्यंत शुल्क भरता येणार आहे. 7 मार्च रोजी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीची पात्रता, शुल्क आणि अन्य माहिती https:// nta. ac. in/, https:// pgcuet. samarth. ac. in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा

जयस्तंभ अभिवादन दिन तयारी पूर्ण; एक जानेवारीपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल : देवेंद्र फडणवीस
पश्चिम महाराष्ट्रातील 20 हजार ग्राहकांची वीज खंडित

 
Latest Marathi News ‘एनआयओएस’कडून दहावी-बारावीचा निकाल जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.