Weather News : राज्यात शीतलहरी सौम्य; नगर 11.7 तर पुणे 12.1 अंशांवर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ढगाळ वातावरणामुळे उत्तर भारतातून येणार्या शीतलहरींना काही प्रमाणात अडथळा आल्याने थंडीची लाट किंचित कमी झाली आहे. गुरुवारी नगरचे तापमान सर्वांत कमी 11.7 अंशांवर होते. दरम्यान, राज्यात 2 जानेवारीपर्यंत थंडी राहील. त्यानंतर ती कमी होत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतात पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांत अजूनही तापमान 4 ते 8 अंशांवर आहे. त्या भागात दाट धुके असल्याने द़ृष्यमानता 50 मीटरपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे हवामानाचा रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात मात्र अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त ढग आल्याने 30 डिसेंबर ते 2 जानेवरी या काळात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्याचा परिणाम बुधवारपासून दिसून आला.
गुरुवारचे राज्याचे किमान तापमान
नगर 11.7, पुणे 12.1, जळगाव 13.9, कोल्हापूर 17.2, महाबळेश्वर 14.6, नाशिक 14.1, सांगली 16.8,सातारा 13.8, सोलापूर 16.4, धाराशिव 16.1, छत्रपती संभाजीनगर 13, परभणी 13.4, नांदेड 16,बीड 15, अमरावती 14.9, बुलडाणा 15.4, चंद्रपूर 13, गोंदिया 12.4.
हेही वाचा
Kolhapur News : पदस्थापनेत भरणारा ‘बाजार’ उधळला
अमरावती : कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचा अपघात, ३ ठार तर ४ जण गंभीर
Hafiz Saeed : दहशतवादी हाफीज सईदच्या प्रत्यर्पणाची भारताची पाकिस्तानकडे मागणी
Latest Marathi News Weather News : राज्यात शीतलहरी सौम्य; नगर 11.7 तर पुणे 12.1 अंशांवर Brought to You By : Bharat Live News Media.
