एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला असून, ते 6 जानेवारीपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौर्‍यात शिवसेनेकडे असलेल्या 16 लोकसभा मतदारसंघात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मते मागायची असून, मिशन 48 ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतले … The post एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले appeared first on पुढारी.

एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला असून, ते 6 जानेवारीपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौर्‍यात शिवसेनेकडे असलेल्या 16 लोकसभा मतदारसंघात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मते मागायची असून, मिशन 48 ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत प्रचाराचा नारळ यवतमाळ येथे फोडण्याचे जाहीर केले आहे. (Eknath Shinde)
शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक गुरुवारी व्हिसीद्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते. या पक्ष पदाधिकार्‍यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले. (Eknath Shinde)
हे प्रचारमेळावे दोन टप्प्यांत पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी यवतमाळ येथून सुरू होणार असून 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात 25 जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना पुन्हा सुरुवात होणार असून 25 जानेवारी रोजी शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल.
या शिवसंकल्प अभियानाची तयारी करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली असून स्थानिक पदाधिकार्‍यांच्या साथीने या प्रचार मेळाव्यांची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील लोकसभेच्या 48 जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महायुतीच्या एकत्रित सभाही राज्यभरात आयोजित करण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले. (Eknath Shinde)
सरकारचे काम घराघरांत पोहोचवण्याचा निर्धार
राज्यातील वातावरण सध्या महायुतीला सकारात्मक असून प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करणारे सरकार अशी आपल्या सरकारची जनमानसात ओळख आहे. त्यामुळे सरकारने केलेली चांगली कामे लोकांपर्यंत पोहोचवून आपल्याला मते मागायची असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा साजरा करा
22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी घराबाहेर भगवा झेंडा लावावा, गुढ्या उभाराव्यात, जागोजागी दीपोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
कोल्हापुरात विशेष महाशिबिर
या प्रचार मेळाव्यांचा समारोप 30 जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल. या प्रचार मेळाव्यांचा समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील, असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.
Latest Marathi News एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले Brought to You By : Bharat Live News Media.