Nagar : बिबट्याचा हल्ला नव्हे तर खुनच !

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीला सोशल मिडियाच्या माध्यामतून संदेश पाठविणार्‍या तरूणाचा खून केल्याची घटना तालुक्यातील कुरकुटवाडी येथे घडली. या घटनेनंतर सदर तरूणावर बिबट्याचा हल्ला झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे. गणेश कुरकुटे (रा. कुरकुटवाडी ता. संगमनेर- असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … The post Nagar : बिबट्याचा हल्ला नव्हे तर खुनच ! appeared first on पुढारी.

Nagar : बिबट्याचा हल्ला नव्हे तर खुनच !

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीला सोशल मिडियाच्या माध्यामतून संदेश पाठविणार्‍या तरूणाचा खून केल्याची घटना तालुक्यातील कुरकुटवाडी येथे घडली. या घटनेनंतर सदर तरूणावर बिबट्याचा हल्ला झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे. गणेश कुरकुटे (रा. कुरकुटवाडी ता. संगमनेर- असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घटना घडल्यानंतर तब्बल 19 दिवसानंतर उघडकीस आला आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी गावामध्ये गेल्या महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गावातील सचिन भानुदास कुरकुटे हा बावीस वर्षीय तरुण आपल्या घराच्या पडवीत झोपलेला असताना त्याच्या गळ्याला खोलवर जखम झालेल्या अवस्थेत आळेफाटाच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारापूर्वीच तो मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सुरुवातीला सचिन कुरकुटे याच्यावर बिबट्याने हल्ला केला असल्याची सर्वत्र बोंब उठवली गेली. आळेफाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मयताची उत्तरीय तपासणी केली. उत्तरीय तपासणी अहवालातून सचिन कुरकुटे या तरुणाच्या गळ्यावर झालेली जखम प्राण्याच्या दातांची अथवा नखांची नव्हे तर तीक्ष्ण हत्याराची असल्याचे शवविच्छेद अहवालावरूनच स्पष्ट झाले. यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांना सोबत घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली. मयत तरुणाच्या सामाजिक संबंधांसह आर्थिक व नाजूक संबंधांवरही प्रकाश टाकण्यात आला. यासर्व गोष्टी तपासल्या जात असताना एका छोट्याशा गोष्टीतून या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
सर्वप्रथम घारगाव पोलिसांनी गणेश कुरकुटे यास ताब्यात घेत त्याच्या खुनाचा गुन्हा दाखल करत अटक केली. त्यास सचिन कुरकुटे याच्या हत्येविषयी विचारले असता त्याने अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाकी हिसका दाखवताच आपणच सचिन कुरकुटेचा खून केला असल्याची कबुली दिली. गणेश कुरकुटे यास न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शवविच्छेदन अहवालामुळे उकलले गुढ
या घटनेतील मयत सचिन कुरकुटे याच्या गळ्याजवळ जखम असल्याने त्यावर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा गावभर होत होती. परंतु पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेत हा वेगळाच प्रकारच असल्याचा संशय होता. त्यामुळे सदर तरूणाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मयत सचिन याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याचे स्पष्ट झाले. हा गोपनीय ठेवत पोलिसांनी तपसाचा चक्रे फिरविली. यामध्ये आरोपी गणेश कुरकुटे अलगद अडकला. शवविच्छेदनामुळे या घटनेचा पोलखोल झाला.
हेही वाचा :

OBC Reservation : तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, छगन भुजबळांची जरांगेंवर जहरी टीका
या दिवाळीत पुणेकरांकडून 11 कोटींचा घरगुती फराळ फस्त

The post Nagar : बिबट्याचा हल्ला नव्हे तर खुनच ! appeared first on पुढारी.

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीला सोशल मिडियाच्या माध्यामतून संदेश पाठविणार्‍या तरूणाचा खून केल्याची घटना तालुक्यातील कुरकुटवाडी येथे घडली. या घटनेनंतर सदर तरूणावर बिबट्याचा हल्ला झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे. गणेश कुरकुटे (रा. कुरकुटवाडी ता. संगमनेर- असे अटक केलेल्या आरोपीचे नाव …

The post Nagar : बिबट्याचा हल्ला नव्हे तर खुनच ! appeared first on पुढारी.

Go to Source