अभिनेत्री ईशा कोप्पिकर-टीम्मी नारंगचा घटस्फोट, 14 वर्षांचा संसार मोडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री ईशा कोप्पिकर आणि तिचा टीम्मी नारंग यांचा घटस्फोट झाला आहे. ईशा आणि टीम्मी यांचा 2009 मध्ये विवाह झाला होता. दोघांनी आता 14 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2023 मध्येच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. इशा आणि नारंग यांच्या घटस्फोटा मागचे कारणही समोर आले आहे. … The post अभिनेत्री ईशा कोप्पिकर-टीम्मी नारंगचा घटस्फोट, 14 वर्षांचा संसार मोडला appeared first on पुढारी.

अभिनेत्री ईशा कोप्पिकर-टीम्मी नारंगचा घटस्फोट, 14 वर्षांचा संसार मोडला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री ईशा कोप्पिकर आणि तिचा टीम्मी नारंग यांचा घटस्फोट झाला आहे. ईशा आणि टीम्मी यांचा 2009 मध्ये विवाह झाला होता. दोघांनी आता 14 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2023 मध्येच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे.
इशा आणि नारंग यांच्या घटस्फोटा मागचे कारणही समोर आले आहे. दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते. त्यामुळे त्यांचे खटके उडायला लागले होते. अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याच निर्णय घेतला आणि त्याची प्रक्रिया पूर्ण केली. घटस्फोटानंतर ईशा कोप्पिकर तिच्या ९ वर्षांच्या रियाना या मुलीला घेऊन नारंगच्या घरातून बाहेर पडली आहे. आता ती दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्याचे समजते आहे.
ईशा कोप्पिकर आणि टीम्मी नारंग यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली होती. त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. एकमेकांना डेट करण्याआधी दोघांमध्ये तीन वर्षे मैत्रीचे नाते होते. त्यानंतर 2009 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. त्यानंतर ईशाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला.
ईशा कोप्पीकर कंपनी चित्रपटातल्या ‘बचके तू रहना’मुळे प्रसिद्ध झाली. या गाण्यामुळे तिला ‘खल्लास गर्ल’ अशी ओळख मिळाली. त्यानंतर तिने ‘पिंजर’, ‘डरना मना है’, ‘रुद्राक्ष’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘हम तुम’ आणि ‘क्या कूल है हम’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Latest Marathi News अभिनेत्री ईशा कोप्पिकर-टीम्मी नारंगचा घटस्फोट, 14 वर्षांचा संसार मोडला Brought to You By : Bharat Live News Media.