Nagar : गेट बनविण्यावरून दोन गटांत हाणामार्‍या

संगमनेर पुढारी वृत्तसेवा :  लोखंडी गेट बनविण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत चौघे जखमी झाले आहेत. संगमनेर शहर पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी वरून दोन्ही गटाच्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील पद्मनगर येथील हातमाग विणकर सोसायटीला लोखंडी गेट बनविल्यास ये-जा करण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे गेट बनवू नको, असे म्हणाल्याचा राग … The post Nagar : गेट बनविण्यावरून दोन गटांत हाणामार्‍या appeared first on पुढारी.

Nagar : गेट बनविण्यावरून दोन गटांत हाणामार्‍या

संगमनेर Bharat Live News Media वृत्तसेवा :  लोखंडी गेट बनविण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत चौघे जखमी झाले आहेत. संगमनेर शहर पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी वरून दोन्ही गटाच्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील पद्मनगर येथील हातमाग विणकर सोसायटीला लोखंडी गेट बनविल्यास ये-जा करण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे गेट बनवू नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने विकास अंबादास रच्चा, साई विजय आडेप यांनी रवींद्र उडता, राधाबाई उडता आणि ऋषिकेश संतोष सोमा यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. रवींद्र उडता यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पद्मानगर भागात राहणारे विकास रच्चा ज्या गल्लीमध्ये राहत आहे. त्या गल्लीत ते लोखंडी गेटचे काम करत होते. त्यावेळी रवींद्र उडता व त्यांची आई, भाऊ, बहीण आणि भाचा यांनी ‘या ठिकाणी गेट बनवायचे नाही, ही जागा काय तुमच्या बापाची आहे का’, असे म्हणत नरेश हिरालाल उडता यांनी विकास रच्चा यांच्या मुलांना तसेच उमा अंबादास रच्चा यांना मारहाण केली. अंबादास रच्चा यांनी संगमनेर शहर पोलिस फिर्याद दिली आहे. रवींद्र हिरालाल उडता, नरेश हिरालाल उडता, अनिता हिरालाल उडता, मयुरी नरेश उडता, ऋषिकेश संतोष सोमा आणि ऋतुजा सोमा या सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Latest Marathi News Nagar : गेट बनविण्यावरून दोन गटांत हाणामार्‍या Brought to You By : Bharat Live News Media.