करणी सेना प्रमुखांच्‍या हत्‍येतील आरोपीच्‍या घरावर ‘बुलडोझर’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी (Karni Sena chief Murder case) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेल्या रोहित राठोड याच्या घरावर जयपूर ग्रेटर महापालिकेने आज (दि.२८) बुलडोझर चालवला. (Bulldozer action) राठोड याचे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते, असे मनपा सूत्रांनी म्‍हटले हाेते. रोहित राठोड हा सुखदेव सिंह गोगामेडी यांच्‍यावर गोळीबार करणार्‍या … The post करणी सेना प्रमुखांच्‍या हत्‍येतील आरोपीच्‍या घरावर ‘बुलडोझर’ appeared first on पुढारी.
करणी सेना प्रमुखांच्‍या हत्‍येतील आरोपीच्‍या घरावर ‘बुलडोझर’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी (Karni Sena chief Murder case) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेल्या रोहित राठोड याच्या घरावर जयपूर ग्रेटर महापालिकेने आज (दि.२८) बुलडोझर चालवला. (Bulldozer action) राठोड याचे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते, असे मनपा सूत्रांनी म्‍हटले हाेते.
रोहित राठोड हा सुखदेव सिंह गोगामेडी यांच्‍यावर गोळीबार करणार्‍या आरोपींपैकी एक आहे. त्‍याचे जयपूरमधील खातीपुरा परिसरात घर होते. ते बेकायदाशीरपणे बांधण्‍यात आले होते, असे महानगरपालिकेने स्‍पष्‍ट केले. यानंतर आज (दि.२८) त्‍याचे घर महापालिका अधिकार्‍यांनी जमीनदोस्‍त केले. ( Karni Sena chief Murder case )
करणी सेनेच्या प्रमुख गोगामेडी यांच्‍यावर ५ डिसेंबर रोजी जयपूरमधील त्यांच्या घरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. गोळीबारातील आरोपी रोहित राठोड आणि नितीन फौजी त्यांच्या एका साथीदारासह चौघांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाईत 9 डिसेंबर रोजी चंदीगडमध्ये अटक केली होती.
गोगामेडी यांची हत्‍या झाल्‍यानंतर फेसबुक पोस्ट करत, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेला गँगस्टर रोहित गोदारा याने गोगामेडीच्या हत्येची जबाबदारी स्‍वीकारली होती. जमीनच्‍या वादातून हा प्रकार घडल्‍याचा दावा करण्‍यात आला. आरोपींना अटक केल्यानंतर नितीन फौजी याने रोहित गोदरा आणि त्याचा जवळचा साथीदार वीरेंद्र चरण यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली होती.
हेही वाचा :

Karni Sena president : करणी सेना अध्‍यक्षांची हत्‍या जमिनीच्‍या वादातून : पोलिसांचा संशय
Sukhdev Singh Gogamedi : लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्‍वीकारली करणी सेना अध्‍यक्षांच्‍या हत्येची जबाबदारी

 

Latest Marathi News करणी सेना प्रमुखांच्‍या हत्‍येतील आरोपीच्‍या घरावर ‘बुलडोझर’ Brought to You By : Bharat Live News Media.