
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभासचा ‘सालार: भाग १- सीझफायर’ ( Salaar ) चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर १७८.७ कोटी रुपयांची भरघोस अशी कमाई केली आहे. आता रिलीजच्या अवघ्या सहा दिवसांत चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे.
संबंधित बातम्या
Priya Bapat : तेच जर मराठी अभिनेत्रींनी केलं तर संस्कृती आड का येते? प्रियाने सुनावले…
Prabhas Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा हिंदी मार्केटमध्ये ९० कोटींचा गल्ला
Salaar Box Office Collection Day 2 : प्रभासने मोहात पाडलं! सालारने तोडले कमाईचे रेकॉर्ड
प्रशांत नील दिग्दर्शित प्रभासचा ‘सालार’ ( Salaar ) हा चित्रपट पॅन इंडियाच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये सादर करतो. या चित्रपटात प्रभासचे अॅक्शन सीक्वेन्स आणि परफॉर्मन्स चाहत्यांना खूपच आवडले आहेत. ‘बाहुबली’ नंतर प्रभासने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला आहे. हा चित्रपट रिलीज होवून सहा दिवस झाले असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, ‘सालार’ चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. अजून दिवसेंदिवस चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. या चित्रपटाला विकेंड आणि ख्रिसमसच्या सुट्यांचा फायदा झाला आहे.
होम्बले फिल्म्सचा ‘सलार: भाग १ सीझफायर’ चित्रपट निर्माते प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटात साऊथ स्टार प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू हे कलाकार दिसले आहेत. तर, चित्रपटाची निर्मिती विजय किरगांडूर यांनी केली आहे.
Latest Marathi News प्रभासच्या ‘सालार’चा धुमधडाका; ५०० कोटींच्या क्लबमध्ये Brought to You By : Bharat Live News Media.
