INDW vs AUSW : भारताचे ऑस्ट्रेलियाला 283 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDW vs AUSW ODI : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज (28 डिसेंबर) पहिला सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावून 282 … The post INDW vs AUSW : भारताचे ऑस्ट्रेलियाला 283 धावांचे लक्ष्य appeared first on पुढारी.

INDW vs AUSW : भारताचे ऑस्ट्रेलियाला 283 धावांचे लक्ष्य

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : INDW vs AUSW ODI : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज (28 डिसेंबर) पहिला सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावून 282 धावा केल्या. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. पूजा वस्त्राकरने नाबाद 62 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून ॲशले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डार्सी ब्राउन, अॅनाबेल सदरलँड, मेगन शुट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्माने निराशा केली. ती एक धाव करून बाद झाली. तिला डार्सी ब्राउनने बोल्ड केले. यानंतर यस्तिका भाटियाने ऋचा घोषसोबत दुसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. ऋचा 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही आणि नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यास्तिकचे अर्धशतक हुकले. 64 चेंडूत 49 धावा करून ती बाद झाली. यानंतर दीप्ती शर्माने 21, अमनजोत कौनने 20 आणि स्नेह राणाने एका धावेचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जचे शतक हुकले. तिने 77 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी पूजा वस्त्राकरने जलद धावा करत उत्कृष्ट अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.
 
Latest Marathi News INDW vs AUSW : भारताचे ऑस्ट्रेलियाला 283 धावांचे लक्ष्य Brought to You By : Bharat Live News Media.