१० जानेवारीनंतर राज्यात नवा मुख्यमंत्री: वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी संपल्यावर आता राजकीय वर्तुळात यासंदर्भात निकालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात नेतृत्वाबदल होणार असल्याचा दावा केला आहे. संबंधित बातम्या – Hain Taiyaar Hum: देणगीसाठी काँग्रेसची अभिनव शक्कल, खुर्चीवर … The post १० जानेवारीनंतर राज्यात नवा मुख्यमंत्री: वडेट्टीवार यांचा दावा appeared first on पुढारी.

१० जानेवारीनंतर राज्यात नवा मुख्यमंत्री: वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा – शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी संपल्यावर आता राजकीय वर्तुळात यासंदर्भात निकालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात नेतृत्वाबदल होणार असल्याचा दावा केला आहे.
संबंधित बातम्या –

Hain Taiyaar Hum: देणगीसाठी काँग्रेसची अभिनव शक्कल, खुर्चीवर क्यूआर कोड
Maharashtra Politics : शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कुठेही जाणार नाही : बच्चू कडू
Pimpri : सांगवी येथे रंगणाऱ्या पवनाथडी जत्रेची महापालिकेकडून तयारी सुरू

वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, १० तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बोहल्यावर बसेल. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसलेले आहेत. अनेकांनी कपडे शिवून ठेवले आहेत, असेही ते म्हणाले. आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहोत. जागावाटपासाठी उद्या दिल्लीत महाराष्ट्र राज्याविषयी बैठक आहे. आमच्या पक्षाच्या सर्व्हेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ३० पेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, असे अंदाज आले आहेत. विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल व विदर्भातून आम्ही दहा पैकी सात जागा जिंकू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
Latest Marathi News १० जानेवारीनंतर राज्यात नवा मुख्यमंत्री: वडेट्टीवार यांचा दावा Brought to You By : Bharat Live News Media.