कतारमधील ‘त्या’ 8 माजी नौदल जवानांची फाशीची शिक्षा तुरुंगवासात बदलली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Indian Sailors In Qatar : कतारमध्ये कथित हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या माजी जवानांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयाला कतारमधील न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दाहरा ग्लोबल प्रकरणात कतारच्या अपील न्यायालयाच्या आजच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली आहे, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. आम्ही सविस्तर निर्णयाची वाट पाहत आहोत. कतारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी आज अपीलीय न्यायालयात उपस्थित होते. यात पीडितांचे कुटुंबीयही होते. खटल्याच्या सुरुवातीपासूनच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत देत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू.
काय प्रकरण आहे?
30 ऑगस्ट रोजी कतारची गुप्तचर संस्था ‘नॅशनल सिक्युरिटी ब्युरो’ने आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना अटक केल्यावर हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आले. या अधिका-यांना कोणत्याही आरोपाशिवाय ताब्यात घेऊन जेलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, त्याच्यावर हेरगिरीचा आरोप असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्यानंतर या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कतारच्या फर्स्ट इन्स्टन्स कोर्टाने फाशीच्या शिक्षेचा निर्णय दिला होता.
वृत्तानुसार, सेवानिवृत्तीनंतर हे सर्व नौदल अधिकारी कतारच्या दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करत होते. ही कंपनी कतारी एमिरी नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. ही कंपनी कतारच्या संरक्षण, सुरक्षा आणि इतर सरकारी संस्थांची स्थानिक भागीदार म्हणून दावा करते.
Death sentences of eight Indians in Qatar commuted: MEA
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2023
Latest Marathi News कतारमधील ‘त्या’ 8 माजी नौदल जवानांची फाशीची शिक्षा तुरुंगवासात बदलली Brought to You By : Bharat Live News Media.
