श्रीराम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी भव्य दीपोत्सव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : समस्त भारतीयांच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा मानबिंदु असलेल्या अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने मुंबईत मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. … The post श्रीराम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी भव्य दीपोत्सव appeared first on पुढारी.

श्रीराम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी भव्य दीपोत्सव

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : समस्त भारतीयांच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा मानबिंदु असलेल्या अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने मुंबईत मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या

Congress On Uddhav Sena: लोकसभा निवडणूक २०२४: महाराष्ट्रात उद्धव सेनेची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली
Kolhapur : आजरा साखर कारखाना अध्यक्षपदी वसंतराव धुरे, एम.के. देसाई उपाध्यक्ष
नागपुरात आज काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

मुंबईतील वाळकेश्वर येथील प्रभु श्रीराम यांच्या चरणांनी पावन झालेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी महापालिकेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांची योजना आखण्यात आली आहे. या अंतर्गत बाणगंगा तलाव येथे २२ जानेवारी २०२४ रोजी दीपोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा दीपोत्सव सर्व मुंबईकरांसाठी खुला असणार आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याचदिवशी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असून, प्रसाद वाटप होणार आहे.
लोढा यांच्या पुढाकाराने आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ५ ते १५ जानेवारीच्या दरम्यान शाळकरी मुलांसाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्यान चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविता लेखन आणि नाट्य स्पर्धा अशा स्पर्धा होणार असून १ ली ते ५ वी प्राथमिक गट आणि ६ वी ते १० माध्यमिक गट अशी विभागणी करण्यात आलेली आहे.
Latest Marathi News श्रीराम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी भव्य दीपोत्सव Brought to You By : Bharat Live News Media.