पिंपरी : आंदर मावळात राष्ट्रवादीचा शुक्रवारी मेळावा

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या वतीने फळणे फाटा येथे शुक्रवार (दि. 29) दुपारी साडेचार वाजता आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी परिवार स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. या स्नेहमेळाव्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेशअप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, जिल्हा परिषद माजी सभापती बाबूराव वायकर, अतिष परदेशी आदींसह तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आंदर मावळातील ज्येष्ठ नागरिक, महिला, आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा संपन्न होणार आहे. पक्षाच्या वतीने ’संकल्प दूरदृष्टीचा सर्वांगीण विकासाचा’ ही संकल्पना घेऊन आंदर मावळातील गावभेट दौरा घेतला होता. या दौर्यात स्थानिक गावकर्यांनी विकासाची कामे सुचवली होती. तसेच वैयक्तिक अडचणी, विविध शासकीय योजनांचा लाभ या विषयाचे प्रस्ताव दिले होते. या सर्व बाबींचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार सुनील शेळके यांना दिला होता. यामध्ये विविध समस्यांची सोडवणूक झाली आहे. तर विविध विकासकामे मार्गी लागल्याचे खांडगे यांनी सांगितले.
हेही वाचा
‘पंढरीचा वारकरी’ विधानसभेतही वारकरीच राहिले : देवेंद्र फडणवीस
पालिका शाळांत विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी कधी?
Pimpri : सांगवी येथे रंगणाऱ्या पवनाथडी जत्रेची महापालिकेकडून तयारी सुरू
Latest Marathi News पिंपरी : आंदर मावळात राष्ट्रवादीचा शुक्रवारी मेळावा Brought to You By : Bharat Live News Media.
