SA vs IND Test : डीन एल्गर सुसाट, ओलांडला १५० धावांचा टप्पा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जात आहे. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 11 धावांची आघाडी घेतली हाेती. (SA vs IND Test Day 3) तिसर्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर एल्गरसह मार्को जॅन्सन दक्षिण आफ्रिकेचा धाव फलक हलता ठेवला. डीन एल्गरने याने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याला साथ देणारा मार्को जॅन्सन १९ धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघाने ५ गडी गमावत ३८ धावांची आघाडी घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जात आहे. नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 245 धावा करून भारत ऑलआऊट झाला. केएल राहुलने 101 धावांची खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले.
डीन एल्गरचे दमदार शतक
दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 256 धावा केल्या. डीन एल्गर 140 धावा करून नाबाद राहिला. आता भारताला तिसऱ्या दिवशी शक्य तितक्या लवकर दक्षिण आफ्रिकेचा ऑलआऊट करावा लागेल. कारण, द. आफ्रिकेने पहिल्या डावात 50 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतल्यास भारताला सामन्यात पुनरागमन करणे कठीण होण्याची शक्यता आहे. डीन एल्गरने शानदार शैलीत कसोटी कारकिर्दीतील 14 वे शतक झळकावले. त्याने पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या डेव्हिड बेडिंगहॅमसोबत चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने 2-2 विकेट घेतल्या.
There’s no stopping him🤯
Dean Elgar marchs on to 1️⃣5️⃣0️⃣ runs 🏏
What an innings this has been from him 😍#WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/qhtGhYqeGb
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 28, 2023
Latest Marathi News SA vs IND Test : डीन एल्गर सुसाट, ओलांडला १५० धावांचा टप्पा Brought to You By : Bharat Live News Media.
