शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघा अंतर्गत पाचही जिल्ह्यांतून यादीवर दाखल झालेल्या ११ हजार २८६ हरकती प्रशासनाने निकाली काढल्या आहेत. शनिवारी (दि. ३०) अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी केली जाणार आहे. दरम्यान, २०१८ च्या तुलनेत विभागात यंदा एकूण शिक्षक मतदारांच्या संख्येत सुमारे १० हजारांनी वाढ झाली आहे.
पुढील वर्षी जुलै महिन्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. विभागातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर या पाचही जिल्ह्यांत मतदार नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये ६४ हजार ७८६ शिक्षकांनी यादीत नाव समाविष्ट केले. दरम्यानच्या काळात यादीवर ११ हजारांवर २८६ हरकती प्राप्त झाल्या. सर्वाधिक ५ हजार ७१५ हरकती नाशिक जिल्ह्यातून दाखल झाल्या. प्रशासनाने यातील पाच हजार ४०० हरकती मान्य केल्या. दरम्यान, दाखल हरकती व दावे निकाली काढल्यानंतर शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्हानिहाय हरकती
नाशिक : ५७१५
जळगाव : १९३०
नगर : १५६४
नंदुरबार : ११७२
धुळे : ९०५
एकूण : ११२८६
हेही वाचा :
भारताने केली दहशतवादी हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी
Covid-19 Updates : देशात कोरोनाचे २४ तासांत ६९२ नवे रूग्ण, ६ मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघे
Crime news : दागिने चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Latest Marathi News शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी Brought to You By : Bharat Live News Media.
