
बंगळूर : वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ संशोधन संस्था आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवण्यास सज्ज असून, ‘इस्रो’ १ जानेवारी २०२४ रोजी देशातील पहिले ध्रुवीय मिशन सुरू करणार आहे. ‘इस्रो’ च्या सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली.
संबंधित बातम्या
नवऱ्याला आली चहाची तलफ; बायकोला केली फर्माईश, तिने डोळ्यात खुपसली कात्री
Gold Rate | सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
हात, चेहरा, पोटाचे स्नायू सुजतात का? वॉटर रिटेन्शनचे कारण काय?
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१० वाजता हे प्रक्षेपण होईल. यामध्ये पीएसएलव्ही सी ५८ सह एक्स-रे पोलरीमेट्री सॅटेलाईट (एक्स्पो सॅट) पाठवले जाणार आहे. हा उपग्रह क्ष- किरणांचा डेटा गोळा करेल. तसेच कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करेल. एक्स्पो सॅट ही आदित्य एल १ आणि अॅस्ट्रो सेंटनंतर अंतराळात स्थापन होणारी तिसरी वेधशाळा असेल.
२०२१ मध्ये लाँच केलेल्या ‘नासा’च्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोररनंतर हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन आहे.
तेजस्वी ताऱ्यांचा अभ्यास करणार
या मोहिमेचे उद्दिष्ट विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणे असे आहे. यामध्ये पल्सर, ब्लॅक होल एक्स- रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, न्यूट्रॉन तारे आणि थर्मल नसलेल्या सुपरनोव्हाचे अवशेष समाविष्ट आहेत. हा उपग्रह ५००-७०० कि.मी.च्या कमी पृथ्वीच्या कक्षे स्थापित केला जाईल. तो ५ वर्षे विविध स्वरूपाची माहिती गोळा करेल. हा उपग्रह व त्याचा पेलोड यूआर राव उपग्रह आणि रमण संशोधन संस्थेने तयार केला आहे. याव्दारे अंतराळातील दूरच्या स्रोतांची भूमिती आणि यंत्रणा यांची माहिती जमा करणे शक्य होणार आहे.
Latest Marathi News ‘इस्रो’ १ जानेवारी रोजी सुरू करणार पहिले ध्रुवीय मिशन Brought to You By : Bharat Live News Media.
