नवऱ्याला चहाची तलफ नडली; संतापलेल्या बायकोने डोळ्यात खुपसली कात्री

बागपत (उत्तर प्रदेश); Bharat Live News Media ऑनलाईन : जेंव्हा सकाळ-सकाळ अंकितने बायकोकडे चहाची मागणी केली, तेंव्हा संतापलेली बायको खोलित गेली. थोड्या वेळाने कात्री घेउन बाहेर आली आणि बेडवर बसलेल्या पतीच्या डोळ्यात खुपसली. या हल्ल्यात पती अंकित रक्तबंबाळ होवून जमिनीवर कोसळला. आरडाओरडा ऐकून नवऱ्याची वहिनी आणि इतर नातेवाईक त्यांच्या खोलिकडे धावले. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले.
थंडीच्या दिवसात नवऱ्याला बायकोकडे चहा मागणे चांगलेच महागात पडले. फक्कड चहा पिण्याची इच्छा व्यक्त केल्यावर बायकोने नवऱ्याच्या डोळ्यात कात्री खुपसली. इतकेच नाही, पोलिस येण्याच्या आधीच ही महिला घरातून फरार झाली. जखमी नवऱ्याला मेरठच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बडौत येथील रहिवासी अंकित (वय २८) यांचा ३ वर्षांपूर्वी सूप गावातील एका युवतीशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्वकाही ठिक चालले होते. मात्र गेल्या दिड वर्षापासून काहीना काही कारणावरून नवरा आणि बायकोमध्ये वादावादी आणि मारहाण होवू लागली.
अशाच एका वादावादी दरम्यानच जेंव्हा अंकितने बायकोकडे चहाची मागणी केली, तेंव्हा संतापलेल्या बायकोने खोलितून चाकू आणला आणि बेडवर बसलेल्या नवऱ्याच्या डोळ्यात खुपसला. यावेळी अंकित जखमी होवून जमिनीवर कोसळला. यानंतर झालेल्या आवाजाने नातेवाईक धावत आले. त्यांनी अंकितला तात्काळ रूग्णालयात दाखल करून घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
हेही वाचा :
धक्कादायक ! मुख्याध्यापकांकडूनच मराठा समाजाला दाखले देण्यास टाळाटाळ
Covid-19 Updates : देशात कोरोनाचे २४ तासांत ६९२ नवे रूग्ण, ६ मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघे
Sharad Pawar Meet Bachchu Kadu | शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट, महाविकास आघाडीत परतणार? चर्चेला उधाण
Latest Marathi News नवऱ्याला चहाची तलफ नडली; संतापलेल्या बायकोने डोळ्यात खुपसली कात्री Brought to You By : Bharat Live News Media.
