वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नावर शरद पवार बैठक घेणार

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच शरद पवार बैठक लावणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुळे या वालचंदनगरला वालचंद हिराचंद यांच्या 141 व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्या बोलत होत्या. वालचंदनगर कंपनीचा … The post वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नावर शरद पवार बैठक घेणार appeared first on पुढारी.

वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नावर शरद पवार बैठक घेणार

वालचंदनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच शरद पवार बैठक लावणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुळे या वालचंदनगरला वालचंद हिराचंद यांच्या 141 व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्या बोलत होत्या. वालचंदनगर कंपनीचा मोठा नावलौकिक आहे. मी संसदेत काम करताना वालचंदनगर कंपनीच्या कार्यामुळे माझी मान उंचावत असते. याच कंपनीतील कामगारांचा प्रश्न उद्भवला आहे.
हा प्रश्न प्रेमाने सोडवण्याबाबत माझी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच ते बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावतील. गरज पडल्यास तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचीही मदत घेण्यात येईल. आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकू. मला विश्वास आहे की, वालचंदनगरमध्ये दिवाळी साजरी होईल. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर मिसाळ, महिला अध्यक्ष छाया पडसळकर, युवकचे अध्यक्ष अनिकेत निंबाळकर, विकास खिलारे, सुनिल साबळे, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :

Nashik News : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन
चिंताजनक ! दुष्काळामुळे गाईंच्या किमती उतरल्या

Latest Marathi News वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नावर शरद पवार बैठक घेणार Brought to You By : Bharat Live News Media.